Gram Panchayat Election : रत्नागिरीत शिंदे गटाला भाजपचे कडवे आव्हान; सरपंचासह एक ग्रामपंचायत बिनविरोध

गोळप जिल्हा परिषद गटातील निरूळ ग्रामपंचायत, मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली.
Eknath Shinde Group -BJP
Eknath Shinde Group -BJPSarkarnama
Published on
Updated on

पावस (जि. रत्नागिरी) : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्याच्या गोळप व पावस जिल्हा परिषद (ZP) गटातील सहा ग्रामपंचायतींच्या (Gram Panchyat) निवडणुका (Election) जाहीर झाल्या. एक ग्रामपंचायत व थेट सरपंच बिनविरोध झाल्याने उर्वरित पाच ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात असून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५० जागांपैकी १५ उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. ३५ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. (BJP's bitter challenge to Shinde group in Ratnagiri; One Gram Panchayat with Sarpanch unopposed)

गोळप जिल्हा परिषद गटातील निरूळ ग्रामपंचायत, मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केली. त्यामुळे सात ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले. तसेच, थेट सरपंच निवडणुकीत मागील पाच वर्ष कार्यरत असलेल्या महिला सरपंच पुन्हा थेट सरपंच निवडणुकीत बिनविरोध झाल्या. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली.

Eknath Shinde Group -BJP
Konkan News : भास्कर जाधवांचा भाजपवर मोठा आरोप; ‘पवारांना आलेल्या धमकीमागे भाजपचा हात शक्य’

चांदोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नऊ सदस्यसंख्या असून ठाकरे गट व शिंदे गट-भाजप युती असा सामना होणार आहे. थेट सरपंच निवडणुकीकरिता दोन महिला उमेदवार रिंगणात असून ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. गणेशगुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गट (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांची युती न झाल्याने समोरासमोर उभे ठाकले आहेत. तीन प्रभागांपैकी एका प्रभागात फक्त दोन उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेने उभे केले आहेत. त्यामुळे खरा सामना शिंदे गट व भाजपमध्ये होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाकरिता तीन उमेदवार रिंगणात आहेत व ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता १६ उमेदवार रिंगणात आहेत.

Eknath Shinde Group -BJP
Solapur : सोलापुरात शिंदे गटाला शिवसेनेचा दणका; उपजिल्हाप्रमुखाचा ठाकरे गटात प्रवेश

पावस जिल्हा परिषद गटातील पूर्णगड ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागांपैकी दोन जागा दोन्ही गटांना बिनविरोध झाल्यामुळे सात जागांसाठी थेट निवड होणार आहे. त्याकरिता दोन उमेदवार रिंगणात असून ग्रामपंचायत सदस्यांकरिता १४ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मावळंगे येथे नऊ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात असून सरपंचपदाच्या एका जागेसाठी दोन महिला उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Eknath Shinde Group -BJP
Sureshdada Jain : शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने घेतली सुरेशदादा जैनांची भेट : म्हणाले,‘त्यांचे बोट धरूनच राजकारणात आलो...’

गावडेआंबेरे ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन निवडणुकांमध्ये थेट सरपंचपद बिनविरोध करण्यात आले होते. मात्र, या वेळी गाव पॅनेल मनसे व अपक्ष असे तिघेजण थेट सरपंच निवडणुकीकरिता उभे आहेत. त्यामुळे गाव पॅनेलचे लक्ष्मण सारंग यांचे पारडे जड आहे. कारण, नऊपैकी सहा जागा गाव पॅनेलने बिनविरोध केल्या आहेत. उर्वरित तीन जागांकरिता मागील निवडणुकीप्रमाणे तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट व भाजप असे तीन जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com