भाजपला अवघ्या तीन दिवसांत दुसरा मोठा धक्का!

भाजपचे माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश
Rajesh Dalvi
Rajesh DalviSarkarnama
Published on
Updated on

माथेरान : माथेरान नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अवघ्या तीन दिवसांत भाजपला हा दुसरा धक्का बसला आहे. (BJP's Matheran Former Deputy Mayor Rajesh Dalvi joins NCP)

शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या माथेरानमधील १० नगरसेवकांना रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नुकतेच अपात्र ठरविले आहे. या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. माथेरानमध्ये दळवी हे बऱ्यापैकी ताकद राखून आहेत.

सुमारे तीन वर्षांपूर्वी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत राजेश दळवी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी डावलल्यामुळे त्यांनी सहकारी नितीन शेळके यांच्यासह रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थित घड्याळ हाती बांधले आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माथेरान तालुका अध्यक्ष भगवान चंचे, माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष अजय सावंत हे उपस्थित होते.

Rajesh Dalvi
राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या आदिवासी नेत्याला जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या माथेरान नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ता. २९ ऑक्टोबर रोजी दणका दिला होता. पक्षांतर करणाऱ्या या दहाही नगरसेवकांना अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिला होता.

या अपात्र ठरवलेल्या नगरसेवकांमध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती आकाश कन्हैया चौधरी, नगरसेवक राकेश नरेंद्र चौधरी, संदीप कदम, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव, सोनम दाभेकर, महिला बालकल्याण समितीचे सभापती, प्रतिभा घावरे, शिक्षण समितीचे सभापती, रुपाली आरवाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे यांचा समावेश होता.

Rajesh Dalvi
राष्ट्रवादीतील मित्रासाठी दीपक केसरकरांनी टाकला जयंत पाटलांकडे शब्द!

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत माथेरानच्या शिवसेनेच्या या दहा नगरसेवकांनी कोल्हापूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पक्षांतराच्या निर्णयाविरोधात माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगडचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्यानुसार तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वरील निर्णय दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com