राष्ट्रवादीतील मित्रासाठी दीपक केसरकरांनी टाकला जयंत पाटलांकडे शब्द!

त्यांनी राष्ट्रवादीसाठी पडत्या काळातही चांगले काम केले आहे.
Deepak kesarkar-praveen bhosale-jayant patil
Deepak kesarkar-praveen bhosale-jayant patilsarkarnama

सावंतवाडी : आपले एकेकाळचे सहकारी मित्र असलेले माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांना महामंडळावर घेऊन त्यांना पुन्हा काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीसाठी पडत्या काळातही चांगले काम केले आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र काम करत असताना त्यांनाही एखाद्या महामंडळावर संधी देण्यात यावी, अशी विनंती जयंत पाटील यांना केली आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. (Deepak Kesarkar made this request to Jayant Patil for his friend in NCP)

आमदार केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ‘‘साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी ही सावंतवाडीची परंपरा आहे. आम्ही सत्तेच्या जीवावर पालिकेत कधीही बडेजाव केला नाही. ज्यांना आलिशान केबिन आणि सभागृहात वावरायचं असेल त्यांनी जरूर वावरावं मात्र आम्ही आमची परंपरा कायम राखू,’’ अशा पलटवारही आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर केला.

Deepak kesarkar-praveen bhosale-jayant patil
भाजपत बंड : खासदार संजय पाटलांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेत झेडपी पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्षांना पत्र

रस्ते, पूल, गटार, भिंती अशा तब्बल 47 कामांना विविध योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिले आहेत. ही कामे लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न पाहिला आहे. मात्र, कधी नाही ती गेल्या दोन वर्षांमध्ये येथील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले.

केसरकर म्हणाले, ‘‘जिल्हा दौऱ्यावर आलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी विविध विकास कामासंदर्भात चर्चा केली. यामध्ये गोव्याला जाणाऱ्या तिलारीच्या तिलारीचे कालवे वारंवार शूटर व त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होते, याबाबत लक्ष वेधले आहे. हे कालवे वीस वर्ष जुने असल्याने त्याचे जीवनमान संपले आहे. त्यामुळे नव्याने कालव्यांचे लाइनिंग करण्याच्या सूचना आपण तातडीने बैठक बोलावून अधिकाऱ्यांना द्याव्यात, तसेच प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी विनंती केली आहे. शिरशिंगे येथील धरण प्रकल्प गेली एकवीस वर्षे प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया पार पडली. मात्र, संबंधित प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे संबंधितांची घरे मोडकळीस आली असून त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. स्पेशल केस म्हणून त्यांना आवश्यक मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणग्रस्त केंद्रे गावातील तेरा नागरिकांचा प्रश्नावर वनटाइम सेटलमेंट करण्यात आली आहे. याबाबत लवकरच प्रक्रिया होणार आहे.``

Deepak kesarkar-praveen bhosale-jayant patil
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या स्वागताला शिवसेना आमदाराची हजेरी

केसरकर म्हणाले, ``तिलारीच्या याठिकाणी होणाऱ्या ॲम्युझमेट पार्क प्रकल्प येत्या पाच वर्षांमध्ये पूर्णत्वास येणार आहे. त्यासाठी जलद गतीने हालचाली होणार आहेत. याबाबतही जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा झाली असून त्याने सकारात्मकता दर्शवली आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग, कर्नाटक आणि गोवा राज्यातील पर्यटकांची संख्या लक्षात घेता वर्षाला 50 लाख पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने याठिकाणी विविध अॅक्टिविटी निर्माण केल्या जातील. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरात लवकर मान्यता देण्याची विनंती आपण त्यांच्याकडे केली असून आमदार म्हणून मी माझे कर्तव्य आणि प्रयत्न पार पडले आहे. आता त्यावरची पूर्तता शासनस्तरावर व्हावी, सावंतवाडी दोडामार्ग रस्ता संदर्भात आपण वैयक्तिक लक्ष घातले आहे. येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. शिवाय आजपासून आंबोली रस्त्यावर पडलेले खड्डे सावंतवाडी ते रेड्डीपर्यंत रस्त्यांची झालेली दुरवस्था तसेच वेंगुर्ले या रस्त्याबाबतही लवकरच काम हाती घेण्यात असल्याचे केसरकर म्हणाले.``

Deepak kesarkar-praveen bhosale-jayant patil
संतोष जगताप खून प्रकरणाच्या मास्टर माईंडला अटक; पाटसमधील एका व्यक्तीवरही संशय

गेल्या तेवीस वर्षांमध्ये केसरकरांनी सावंतवाडीमध्ये काहीच केले नसल्याची टीका नारायण राणे यांनी केल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ``राणे यांनी आलिशान केबिन सभागृहमध्ये वावरण्याची सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना केली. ती त्यांची संस्कृती आहे; परंतु सावंतवाडीची परंपराही साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी अशी राहिली आहे. आम्ही तेवीस वर्षात कधीही सत्तेचा दुरुपयोग करत बडेजाव केला नाही. यापुढेही करणार नाही. नागरिकांना नेहमी चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे; परंतु ज्यांना कोणाला तसे वावरायचे असेल तर त्यांनी खुशाल वावरावे. आमच्या त्यांना शुभेच्छा; मात्र आम्ही आमची परंपरा कायम राखू.``

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com