Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे आश्वासन; शिक्षकांनी आम्हाला...

Eknath Shinde News : गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे महत्वपूर्ण निर्णय घेतले, त्याचे समाधान वाटते.
Old Pension Scheme News
Old Pension Scheme NewsSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे महत्वपूर्ण निर्णय घेतले, त्याचे समाधान वाटते. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे उदात्त कार्य करावे. राज्य सरकार त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे यांनी केली. त्याशिवाय जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले. ते शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात शिंदे बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या अधिवेशनाला शिंदे आज उपस्थित होते.

Old Pension Scheme News
Satyajeet Tambe : नगर जिल्ह्यात नवीन राजकीय समिकरणांची नांदी? सत्यजीत तांबे-विखे पाटीलांची भेट

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme) प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे निर्णय घेतले, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Old Pension Scheme News
Shivsena : उद्धव ठाकरेंकडे राहणार फक्त पाच आमदार, विदर्भातील ‘या’ खासदारांनी केला दावा !

दरम्यान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व समिती या दोन शिक्षक संघटनांचे अधिवेशन वेंगुर्ला येथे सुरू आहे. 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. 18 तारखेला महाशिवरात्री आणि 19 तारखेला रविवार असल्याने विद्यार्थांना सलग 5 दिवस सुट्टी आहे. त्या अधिवेशनाला आज मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com