Konkan Political News : लोकसभा निवडणुकांपूर्वीच कोकणात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. चिपळूण येथे चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विरुद्ध भाजप आमदार नीलेश राणे असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. दगडफेक झाली, पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. यामुळे कोकणच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लागल्याची चर्चा होत होती. (Latest Marathi News)
या प्रकरणी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांची धरपकड सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी आता भास्कर जाधव यांनी भेट दिली आहे. या वेळी कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनी शेठ तुम्ही असताना आम्ही घाबरत नाही, असा धीर दिल्याची पोस्ट भास्कर जाधव यांनी आपल्या सोशल मीडियावर केली आहे. (Latest Political News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चार दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये माझ्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीत पोलिसांनी एकतर्फी कारवाई करत माझ्या काही सहकाऱ्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली, असा आरोप भास्कर जाधव यांनी या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. यामुळे कोकणचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. (Shiv Sena News)
चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात असे अनेक प्रसंग आणि संघर्ष माझ्या वाट्याला आले. त्या प्रत्येक संघर्षात मला साथ देणाऱ्या आणि सोबत असलेल्या सहकाऱ्यांना मी कधीही वाऱ्यावर सोडले नाही, तर कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलो. आज पुन्हा तीच वेळ आली तेव्हा ज्यांना ज्यांना अटक झाली आहे, त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर आणि आधार देत आहे, असे जाधव म्हणाले. (Konkan Political News)
R
'घाबरू नका, काळजी करू नका. मी तुमच्या पाठिशी आहे, मी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’, असं जेव्हा मी सांगत होतो, तेव्हा प्रत्येकाच्या कुटुंबातून एकच उद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते, ‘शेठ, तुम्ही असताना आम्ही कशाला घाबरतोय. तुम्ही अन्यायाच्या विरूध्द लढताय. आम्ही आणि आमची मुलं तुमची साथ कधीच सोडणार नाही..!!’ राजकिय आणि सामाजिक जीवनात असं प्रेम करणारे, त्यागाच्या भावनेतून सर्वस्व झाकून देणारे सहकारी खचितच कोणाला लाभतात, अशाही भावना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी या पोस्टमधून व्यक्त केली आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.