Lok Sabha Election 2024 : भाजप, वंचितपाठोपाठ काँग्रेसच्या इच्छुकांचाही प्रचार जोरात, अकोल्यात नेमकं होणार काय?

Akola Politics : अकोला लोकसभा मतदारसंघातील सामना होणार रंगतदार.
Congress,  BJP and Vanchit Bahujan Aghadi
Congress, BJP and Vanchit Bahujan AghadiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. आता काँग्रेसच्या इच्छुकांकडूनही जोरात प्रचार करण्यात येत आहे. उमेदवारी ठरली नसली तरी काँग्रेसच्या एका इच्छुकाने तर घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला आहे.

एकीकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, काँग्रेसच्या इच्छुकांकडून प्रचार सुरू असल्याने मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीत लढण्यासाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आघाडी, युतीत जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत झाल्यानंतर महाविकास आघाडीत तीन पक्षांसह 'वंचित'च्या समावेशानंतर जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खल सुरू आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर लढणार आहेत. त्यांनी पूर्वीच तशी घोषणाही केली आहे. त्यामुळे अकोला मतदारसंघात सध्या इतर पक्षाच्या इच्छुकांकडून प्रचाराला वेग आला आहे. भाजपकडून खासदार धोत्रेंचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी मिळण्यापूर्वीच प्रचार जोरात सुरू करण्यात आला आहे. भाजप आणि वंचित या दोन्ही पक्षांकडून प्रचार सुरू असतानाच काँग्रेसच्या इच्छुकांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress,  BJP and Vanchit Bahujan Aghadi
Akola AMC : लवकरच उभी होणार अकोला महापालिकेची नवी इमारत

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, डॉ. अभय पाटील यांनी गावागावांत जाऊन प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे भाजप, वंचित आणि काँग्रेस यांच्याकडून प्रचाराला वेग आला आहे. भाजपचा उमेदवार निश्चित नसला तरी प्रचार मात्र जोरात सुरू आहे, तर प्रकाश आंबेडकर यांनी पूर्वीच या मतदारसंघात लढणार असल्याचे जाहीर करून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेसच्या इच्छुकांकडूनही प्रचार सुरू झाला असून, नेमकं या मतदारसंघात चित्र काय असणार, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

महाविकास आघाडी वंचितला किती जागा सोडते. अकोला मतदारसंघावर दावा करणाऱ्या वंचितला ही जागा सुटते का, हाही प्रश्न अद्याप कायम आहे. मात्र, काँग्रेसच्या इच्छुकांचा प्रचार जोरात सुरू असल्याने या मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. कारण ही जागा वंचितला सुटल्यास काँग्रेसच्या इच्छुकांचे काय होणार, हेही पुढे पाहावे लागणार आहे. कारण वंचितकडून या मतदारसंघासाठी प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी दावा केला जाणार आहे.

दरम्यान, सध्या अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्याव्यतिरिक्त कोणताही उमेदवार अद्यापही निश्चित नाही. तयारी मात्र सर्वच इच्छुक करीत आहेत. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात नेमकं काय चित्र असेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, अकोला मतदारसंघाची ही निवडणूक मात्र चांगलीच चर्चेत राहणार, हे मात्र नक्की.

Edited By : Atul Mehere

R

Congress,  BJP and Vanchit Bahujan Aghadi
Akola News : राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता तरी मॉडेल रेल्वे स्टेशन होईना!!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com