शिंदे गटाला देगावच्या नागरिकांची चपराक : ग्रामपंचायतीवर केलेला दावा गावकऱ्यांनी फेटाळला

सर्व सदस्यांना राजीनामे द्यायला सांगा आणि पूर्ण ग्रामपंचायतीची निवडणूक पुन्हा घ्या, म्हणजे कोणाची ताकद आहे, ते समजेल, असे आव्हानही दिले
 Shinde group
Shinde groupSarkarnama
Published on
Updated on

दाभोळ (जि. रत्नागिरी) : देगाव ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) सरपंच (Sarpanch) व सदस्यांची निवडणूक (Election) बिनविरोध झाली असून संपूर्ण ग्रामपंचायत पक्षविरहीत अन त्यामुळे ती गाव पॅनेलची आहे, असा दावा गावचे अध्यक्ष सुरेश करंजकर यांनी केला आहे. बाळासाहेबांची शिवसेना (Eknath Shinde शिंदे गटाला) या पक्षाने या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचा दावा सोशल मीडियातून केला होता. तो देगाव येथे पत्रकार परिषदेत खोडण्यात आला. सरपंच व सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली. गावामध्ये प्रथमच सर्व जागांवर महिलाना संधी देण्यात आली आहे. (Citizens rejected claim made by the Shinde group on the Degaon Gram Panchayat)

रामचंद्र गोलांबडे म्हणाले की,‘ गावामध्ये वाद, भांडणतंटे नको म्हणून संपूर्ण गावाने एकमुखाने सर्व जागांवर महिला उमेदवारांना प्राधान्य दिले. गावातील तीन प्रभागातून सात सदस्य व सरपंच पद महिला राखीव असल्याने मराठा समाजातील महिलेला संधी दिली. यासंदर्भात गावामध्ये झालेल्या बैठकीमध्ये कोणीही पक्षीय राजकारण करू नये, असे ठरले. तरीही काही व्यक्तीकडून ही ग्रामपंचायत आमच्या पक्षाच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नाही.’

 Shinde group
Jayant Patil's Suspension: निलंबनावर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया : ‘मुख्यमंत्र्यांचा तो अविर्भाव...’

सामाजिक कार्यकर्ते रमाकांत शिंदे म्हणाले की, गावात कोणत्याही प्रकारचा विकास आजवर झालेला नाही. गावातील स्मशानभूमीवर साधा शेड नाही, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पक्का नाही, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेली मोरी पहिल्याच पावसात वाहून गेली आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून पुढारी दरवेळी आपल्या पक्षाकडे ही ग्रामपंचायत असल्याचा दावा करतात. मात्र गावामध्ये खासदार, आमदार, स्थानिक जिल्हा परिषद व पंचायत समिती फंडातून निधी आणण्यात आला नाही.

 Shinde group
मोठी बातमी : जयंत पाटील ३० डिसेंबरपर्यंत विधानसभेतून निलंबित : विधानसभा अध्यक्षांना अपशब्द उच्चारणे भोवले

विकासकामे शासन निधी व ग्रामपंचायत फंडातून केली जातात. पक्षीय राजकारण करायचे असेल तर आम्ही देखील कोठेही मागे नाही. बिनविरोध ग्रामपंचायत करायची व त्यानंतर पक्षाचे लेबल लावायचे, हे योग्य नाही. पक्षाचे लेबल लावायचे असेल तर सर्व सदस्यांना राजीनामे द्यायला सांगा आणि पूर्ण ग्रामपंचायतीची निवडणूक पुन्हा घ्या, म्हणजे कोणाची ताकद आहे, ते समजेल, असे आव्हानही शिंदे यांनी दिले.

 Shinde group
जयंत पाटलांवर निलंबनाची टांगती तलवार : आक्रमक झालेले मुख्यमंत्री प्रचंड आग्रही

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे प्रसिद्धीपत्रकात देगाव येथील बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच अनुराधा भोसले या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सरपंच असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावेळी माजी उपसरपंच बाळकृष्ण बारे, माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष काशिराम करंजकर, सतीश कदम, भागोजी बाईत, कृष्णा खळे, भिकाजी करंजकर, विकास बाईत यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com