जयंत पाटलांवर निलंबनाची टांगती तलवार : आक्रमक झालेले मुख्यमंत्री प्रचंड आग्रही

त्याबाबत बैठक विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुरू आहे. त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
 Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे विधान केले. त्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक भिडले. सत्ताधारी आमदार विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) याप्रकरणी प्रचंड आक्रमक झाले आहेत. जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित (Suspend) करा, अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुरू असलेल्या बैठकीत केली आहे. त्याबाबत सध्या बैठक सुरू आहे (Suspend Jayant Patil for a year: Chief Minister Shinde )

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सॅलियान आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. त्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना यावर बोलू देण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नकार दिला. त्या गोंधळताच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘ तुम्ही एखाद्या सदस्याचा जीव घ्याल’ असे म्हटले. त्यानंतरही बोलण्यास परवानगी नाकारणाऱ्या अध्यक्षांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे विधान केले. त्यामुळे सभागृहातच एकच गोंधळ उडाला.

 Jayant Patil
शेवाळेंना चेंबूरहून अंधेरीला जाताना तीन तीन गाड्या का बदलाव्या लागतात? : युवा सेनेचा बोचरा सवाल

त्यानंतर आक्रमक झालेल्या सत्ताधारी आमदारांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्याच गोंधळात विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटीलसाहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ पाहून अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज तहकूब केले.

 Jayant Patil
Daund News: पराभव जिव्हारी लागला; ग्रामपंचायतीच्या पराभूत उमेदवारांकडून वाटप केलेल्या पैशांची वसुली सुरू!

दरम्यान, जयंत पाटील यांच्या विषयावर सध्या विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक सुरू आहे. त्यात जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करा, अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. त्याबाबत बैठक विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुरू आहे. त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com