Ratnagiri Shinde Group News : रत्नागिरीत शिंदे गटात जोरदार धुमश्चक्री; माजी सरपंचांवर चॉपरने वार

Shivsena News : त्या तरुणांनी बॅनर का काढला म्हणून नाचणकर यांच्याशी वाद घातला.
shivsena
shivsenasarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : रत्नागिरीत शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन गटांत वाढदिवसाचा बॅनर काढल्याने जोरदार धुमश्चक्री झाली. माजी सरपंच संदीप ऊर्फ बावा नाचणकर आणि त्यांच्या भावाला जमावाने मारहाण केली. त्यात एकाने संदीप नाचणकर यांच्या डोक्यात चॉपरने वार केल्याने ते जखमी झाले आहेत. या राड्यामुळे रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे गावात तणावपूर्ण शांतता आहे. बॅनरवरून राडा झाला असला तरी त्यामागे जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून हा वाद उफाळून आल्याचे चर्चिले जात आहे. (Clash between two factions of Shinde Shiv Sena in Ratnagiri)

रत्नागिरीत अनेक ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेतच दोन गट पडलेले आहेत. त्यातील मिरजोळे या गावाच्या पाटीलवाडी येथील काही तरुणांनी वाढदिवसाचा बॅनर मुख्य रस्त्यावर लावला होता. माजी सरपंच संदीप नाचणकर यांनी तो बॅनर सायंकाळी काढला. पण का काढला म्हणून वाद झाला. पण तो वाद सामोपचाराने मिटविण्यात आला हेाता. मात्र, संदीप नाचणकर यांना काही तरुणांनी बुधवारी रात्री एमआयडीसीतील मजगाव रोड येथील मुख्य रस्त्यावर बोलावले. त्या तरुणांनी बॅनर का काढला म्हणून नाचणकर यांच्याशी वाद घातला.

shivsena
Pawar Demand To Government : शरद पवारांची शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडे मोठी मागणी; आता केंद्राकडे लक्ष...

दरम्यानच्या काळात पाटीलवाडीतील मोठा जमाव नाचणकर यांच्या दिशेने आला. त्याचेवळी संदीप यांचे भाऊही त्या ठिकाणी आले होते. त्याचवेळी जमावातील एकाने नाचणकर यांच्यावर हल्ला करा, असे सांगताच जमावाने त्या दोघांनाही मारहाण केली. संदीप नाचणकर यांच्या डोक्यात एकाने धारदार चॉपरने वार केला. त्यात संदीप नाचणकर जखमी झाले. संदीप नाचणकर यांना स्थानिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

shivsena
Purandhar MLA With Supriya Sule : अजितदादांनी निवडून आणलेले आमदार म्हणतात ‘आम्ही सुप्रियाताईंसोबत...’

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी संदीप कृष्णा नाचणकर यांनी तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित रत्नदीप पाटील, अभी पाटील, वैभव पाटील, हर्षराज पाटील व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या मारहाण प्रकरणी हर्षराज सुभाष पाटील यांनीही तक्रार दिली आहे.

shivsena
Mushrif Revealed NCP Secret : ‘कोर्टात कोणी जायचं नाही, असं आमचं अगोदरच ठरलं होतं’; मुश्रीफांनी सांगितली राष्ट्रवादीची ‘अंदर की बात’

पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आम्ही लावलेला खासगी बॅनर संशयितांनी फाडून नुकसान केले. याचा राग मनात धरून संशयित संदीप उर्फ बावा नाचणकर, योगेश भोसले, भाया कदम, नाना नाचणकर, प्रणय पावसकर व इतर दोन यांनी जमाव करून मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com