Mushrif Revealed NCP Secret : ‘कोर्टात कोणी जायचं नाही, असं आमचं अगोदरच ठरलं होतं’; मुश्रीफांनी सांगितली राष्ट्रवादीची ‘अंदर की बात’

Hasan Mushrif News : भाजपला २०१४ ला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतर २०१७ आणि २०१९ मध्ये तेच केलं. त्या वेळेला काही केलंच नसतं, तर असं झालं नसतं.
Hasan Mushrif
Hasan Mushrif sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ज्येष्ठ नेते शरद पवारांचा फोटो न लावण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहे. कारण, शरद पवारांनीच ‘माझा फोटो लावला, तर मी कोर्टात जाईन,’ असं म्हटलं आहे. कोणीच कोर्टात जायचं नाही, असं पहिल्यांदा ठरलं होतं, अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंदर की बात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगून टाकली. (We decided that no one should go to court; Hasan Mushrif )

कोल्हापुरात उद्या (ता. २५ ऑगस्ट) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (ता. २४) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा फोटो लावू नये, अशी सूचना केल्याचे स्पष्ट केले.

Hasan Mushrif
Mushrif Counterattack On Rohit Pawar : रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे; हसन मुश्रीफांचा पलटवार

मुश्रीफ म्हणाले की, आपलेच (राष्ट्रवादी काँग्रेस) लोक चांगल्या भावनेने शरद पवारसाहेबांचा फोटो लावत असतील आणि ते कोर्टात जाणार असतील, तर काहीचं म्हणणं आहे की, त्यांचा फोटो कशाला लावायचा? आम्ही अजितदादांच्या माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी काही मार्ग निवडला. भाजपला २०१४ ला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतर २०१७ आणि २०१९ मध्ये तेच केलं. त्या वेळेला काही केलंच नसतं, तर असं झालं नसतं.

आमचा पक्ष फुटलेला नाही. एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे, असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यावर मुश्रीफ म्हणाले की पाच जुलै रोजीचे अजितदादांचे भाषण नीट ऐका, त्यात त्यांनी स्पष्ट केले आहे की आम्हा एकच पक्ष आहोत. आता कुटुंब एक आहे की काय हे त्यांनाच विचारलं पाहिजे. आम्ही शरद पवार यांना दैवत मानलेलं आहे आणि मानत राहणारच आहे.

Hasan Mushrif
Dada Bhuse On Shivsena Split: शिवसेना का आणि कुणामुळे फुटली?; दादा भुसेंनी सांगितले खरे कारण...

वि. वि. पाटील हे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) लोकसभेचे इच्छूक उमेदवार आहेत. त्यामुळे ते सभेचा प्रयत्न करणारच. त्यांनी फोन करून आम्हाला सहकार्य करा, अशी मागणी केली आहे. शरद पवार यांच्या सभेला उपस्थित राहावा, असे मी काही माझ्या कार्यकर्त्यांना सांगणार नाही. पण, साहेबांची सभा चांगली व्हावी, अशी माझी शुभेच्छा आहे, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.

Hasan Mushrif
Mohol Politics : रमेश कदमांच्या सुटकेने मोहोळची समीकरणे बदलणार; पाटील विरुद्ध पाटील पुन्हा रंगणार सामना?

बाप, बाप असतो, असं शरद पवार यांचं पोस्टर कोल्हापुरात चर्चेत आहे. त्याबद्दल मुश्रीफ म्हणाले की, ठीक आहे ना. शरद पवार हे आम्हाला वडिलांसारखेच आहेत. ते वडिलधारेच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com