'तू राजीनामा मागणारा कोण? अर्धवट वकील'; 'छमछम'चा परवाना रिटर्न करताच, रामदास कदम ठाकरेंच्या शिलेदारावर बरसले!

Ramdas Kadam On Anil Parab : राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्या अडचणी वाढत जाताच आईच्या नावे असणाऱ्या सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला. यानंतर अनिल परब यांनी हल्लाबोल करताना चोरीचा माल परत केला म्हणजे गुन्ह्यातून सुटता येत नाही अशी टीका केली होती.
anil parab Vs Yogesh kadam Ramdas Kadam
anil parab Vs Yogesh kadam Ramdas Kadamsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. शिवसेना (उद्धव गट) नेते अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी व डान्स बार चालवण्याचे आरोप केले.

  2. कदम यांनी सावली बारचा परवाना परत केला, त्यानंतर रामदास कदम यांनी परबांवर टीका केली.

  3. कोकणात शिवसेना-शिंदे गट व उद्धव गट यांच्यातील संघर्षाने राजकीय वातावरण तापलं आहे.

Ratnagiri News : राज्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना घेरण्याचे काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मंत्री अनिल परब यांनी केले होते. कदम यांच्यावर वाळू चोरीसह डान्स बार चालविण्याचा आरोप परब यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. तसेच कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर नुकताच त्यांनी कदम यांच्याविरोधातील पुरावेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. यानंतर कदम यांच्यावर मुख्यमंत्री कोणती कारवाई करतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान कदम यांनी सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत केला. यावरूनही परब यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार टीका करताना परब यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी परब यांना पुन्हा डिवचताना अर्धवट वकील', 'तू राजीनामा मागणारा कोण? असा सवाल केला आहे. यामुळे कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

रामदास कदम यांनी परवाना रद्द करण्याच्या मुद्द्यावरून अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. सावली बारच्या बाबतीत अनिल परब हेतुपुरस्सर बदनामी करत असून ते अर्धवट वकील असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच योगेश कदम यांचा राजीनामा मागणारा तू कोण? असा सवाल ऍग्रिमेंट दाखवत कदम यांनी केला.

anil parab Vs Yogesh kadam Ramdas Kadam
Ramdas Kadam यांनी Uddhav Thackeray यांची सापाशी तुलना का केली ? कदम काय म्हणाले ? | Mumbai News |

यावेळी कदम यांनी खुलासा करताना, शरद शेट्टींना सावली बार चालवायला दिला होता. त्यावेळी ऍग्रिमेंट केलं होते. त्या ऍग्रिमेंटच्या कॉलम 6 मध्ये स्पष्ट केलं आहे की, बारमध्ये कोणताही बेकायदेशीर धंदा चालवणार नाही. तर येथे हॉटेल धंदा होईल. अटींचं भंग होणार नाही. तसेच कॉलम 7 मध्ये, काही कृत्य झाल्यास धंदा चालवणारे जबाबदार असतील. त्यास मालकाची जबाबदारी असणार नाही.

आता या बारमध्ये काही गोष्टी आढळून आल्यानंतर आम्ही तात्काळ शरद शेट्टींशी ऍग्रिमेंट तोडलं आहे. त्याला बाहेर काढल आहे. तसेच दोन्ही लायसन्सही संबंधित विभागाकडे तेव्हाच जमा केले आहेत. मात्र हे प्रकरण परब यांनी अधिवेशनात 18 तारखेला उपस्थित केला असा दावा देखील कदम यांनी केला आहे.

त्यामुळे या प्रकरणाशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे त्यांचा राजीनाम्याचा विषयच येत नाही. पण परब हे दिशाभूल करत असून नियमबाह्य पद्धतीने त्यांनी विधानमंडळात हा विषय काढला. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप तात्काळ काढून टाकावेत अशी मागणी करणारा अर्ज सभापतींना दिलेला असल्याचेही कदम यांनी सांगितले आहे.

anil parab Vs Yogesh kadam Ramdas Kadam
Ramdas Kadam : स्थानिकच्या रणागंणावर 'कदम-कदम बढाये जा'चा नारा! सामंताच्या ऑफरमुळे रामदासभाईंना ताकद

FAQs :

1. योगेश कदम यांच्यावर नेमके आरोप काय आहेत?
अनिल परब यांनी कदम यांच्यावर वाळू चोरी व डान्स बार चालवण्याचा आरोप केला आहे.

2. कदम यांनी डान्स बारचा परवाना परत का दिला?
राजकीय दबाव आणि विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांनी सावली बारचा परवाना परत दिला.

3. रामदास कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली?
रामदास कदम यांनी अनिल परब यांना "अर्धवट वकील" म्हणत जोरदार टीका केली आणि राजीनाम्याची मागणी फेटाळली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com