आगामी स्थानिकबाबत फडणवीसांनी दिलेल्या घोषणेला कोकणात हरताळ; नितेश राणेंकडून स्वबळाचा नारा?

Nitesh Rane On BJP Self-reliance Local body Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचे सांगितले आहे.
Nitesh Rane BJP .jpg
Nitesh Rane BJP .jpgSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लढण्याची घोषणा केली आहे.

  2. मात्र रत्नागिरीत मंत्री नितेश राणेंनी ‘स्वबळावर लढू’ असा दावा करत महायुतीला धक्का दिला आहे.

  3. या वक्तव्यामुळे तळ कोकणात महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मेळावे आणि बैठका घेतल्या जात आहेत. वर्ध्याच्या सेवाग्राम येथील चरखा गृहात विदर्भ स्तरीय आढावा बैठकची आयोजन करण्यात आले आहे. याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित राहणार आहेत. पण याआधी फडणवीस यांनी आगामी स्थानिकबाबत वक्तव्य करताना, आपण ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याचे म्हटले आहे. पण त्यांच्या या आदेशाला तळ कोकणात हरताळ फासण्याचे काम त्यांचेच मंत्री नितेश राणे करताना दिसत आहे. त्यांनी रत्नागिरीत स्वबळाचा नारा देण्याची भाषा केली आहे. यामुळे राज्यातील अभेद महायुतीत संघर्षाची पहिली ठिणगी तळ कोकणात पडल्याचे बोलले जात आहे. (Nitesh Rane’s self-reliance statement creates friction in Mahayuti alliance despite Devendra Fadnavis' call for unity in upcoming local elections)

फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. त्यांनी आपण ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. पण ज्याठिकाणी काही अडचणी येतील तेथे तिन्ही नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. जेथे महायुती म्हणून शक्य नाही तेथे मैत्रिपूर्ण लढती होतील. महायुती नाही म्हणून आपल्याच मित्रपक्षावर कोणीही टीका करायची नाही. आपल्याला या निवडणुकीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवायचे असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे.

Nitesh Rane BJP .jpg
Jitendra Awhad यांची पत्रकाराला मारहाण, Nitesh Rane यांच्याकडून Viral Video ट्वीट, Vidhansabha News

एकीकडे राज्यातील महायुतीचे मुख्य नेते स्थानिकबाबत एकत्र लढण्याची भाषा करत आहेत. पण तळ कोकणातील रत्नागिरीत मात्र भाजपचे मंत्री स्वबळाचा नारा देताना दिसत आहे. यामुळे रत्नागिरीत महायुतीत स्थानिकच्या आधीच ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. येथे भाजपचे नेते व मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी, स्वबळावर लढण्याची संधी द्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करणार असल्याचे म्हटलं आहे.

त्यांनी, येथे महायुती म्हणून चांगले काम होत आहे. भाजपचे कार्यकर्तेही चांगले काम करत आहेत. बूथ कमिट्या मजबूत करण्याचेही काम सध्या जोरात सुरू आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्हाला संधी द्या, संधी मिळाली तरच पक्षाला आम्ही काम करतो हे दाखवता येईल. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांकडून आगामी स्थानिकसाठी स्वबळाची मागणी केली जात आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

तसेच या मागणीबाबत आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत. कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची संधी मागत असल्याचेही त्यांच्या कानावर घालणार असल्याचेही ते म्हणाले. तर सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असून त्यांनी वीस कोटीचा निधी विकासासाठी मिळतो तर भाजपचे खासदार नारायण राणे यांना पाच कोटीचा निधी मिळतो. त्यातही भाजपचे पदाधिकारी जिल्ह्यात चांगले काम करत असल्याचेही ते म्हणालेत.

Nitesh Rane BJP .jpg
एका बातमीने खळबळ, ८ नेत्यांना हटवणार? Kokate, Shirsat, Nitesh Rane Resignation

FAQs :

1. देवेंद्र फडणवीसांनी महायुतीबाबत नेमकं काय म्हटलं?
→ त्यांनी स्पष्ट केलं की आगामी स्थानिक निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढल्या जातील.

2. नितेश राणे यांनी काय वेगळं वक्तव्य केलं?
→ त्यांनी रत्नागिरीत 'स्वबळावर निवडणूक लढणार' असे जाहीरपणे सांगितले.

3. या वक्तव्यामुळे काय परिणाम होऊ शकतो?
→ महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि स्थानिक स्तरावर फूट पडण्याची शक्यता आहे.

4. महायुतीत कोणकोणते पक्ष आहेत?
→ भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे प्रमुख घटक आहेत.

5. नितेश राणेंच्या वक्तव्यावर भाजपने अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे का?
→ अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचं समजतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com