राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट मालदीवच्या मंत्र्यांना डिवचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लक्षद्वीपमधील पर्यटनस्थळांना चालना देण्याची घोषणा केल्यानंतर मालदीवमधील तीन मंत्र्यांचे पित्त खवळले आणि त्यांनी द्वेषाची गरळ ओकली. याचा भारतातून निषेध होत असतानाच फडणवीसांनी मालवणमधील समुद्रकिनाऱ्याचे फोटो शेअर करत 'हम किसी से कम नही' हे दाखवून दिले आहे.
लक्षद्वीपसारखाच कोकणलाही निसर्गरम्य अशा समुद्रकिनाऱ्याचे वरदान लाभले आहे. कोकणातील या निसर्गसंपदा लाभलेल्या किनारपट्टीचे फोटो देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोळ्याचे पारणे फेडणारा समुद्रकिनारा लाभला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी कोकणातील समुद्रकिनाऱ्याचे फोटो शेअर करताना हे मालदीव नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्राला लाभलेले हे आपले सुंदर कोकण! फोटो सिंधुदुर्गातील आहेत, असे म्हणत हे फोटो शेअर करून कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
कोकणला अवश्य भेट द्या आणि छत्रपती शिवाजीमहाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला ते भारतातील पहिले एकात्मिक स्कूबा डायव्हिंग स्कूल एमटीडीसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड एक्वाटिक स्पोर्ट्सचे (IISDA) स्थापत्य पाहून मंत्रमुग्ध व्हा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
तारकर्ली बीचवर विशाल अरबी समुद्राचे चित्तथरारक दृश्य पाहा आणि अनुभव घ्या, अशा स्वरूपाचे आवाहन करणारा कोकणातील पर्यटनाची माहिती देणारा मजकूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.
मालदीवच्या मंत्र्यांना तोंडघशी पाडून कोकणातील निसर्गसौंदर्य, सुंदर समुद्रकिनाऱ्यांची माहिती फेसबुकवरून शेअर करत देवेंद्र फडणवीसांनी एकप्रकारे कोकण पर्यटनाला चालना दिली आहे. कोकणातील समुद्रकिनारे हे पर्यटनाचे मोठे हॉटस्पॉट मानले जातात. आता केंद्राप्रमाणे राज्य सरकारही कोकणातील पर्यटनस्थळांना चालना देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.