Sanjay Raut : राऊतांनी राणेंना घेरलं, कोकणातील जुन्या घटनांचा उल्लेख करत केले गंभीर आरोप; 'त्यांच्या अंगाला, हाताला आणि जीभेला रक्त...'

Sanjay Raut Targets Ranes Over Disha Salian Case : दिशा सालियान मृत्यूप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे.
Disha Salian Case; nitesh rane and Sanjay Raut
Disha Salian Case; nitesh rane and Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिशा सालियान मृत्यूप्रकरणाने पुन्हा एकदा राज्याचे वातावरण ढवळून निघाले असून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह इतरांची नावे आहेत. यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस बजावलीय.

यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सतत आरोप करणाऱ्या राणेंना घेरलं आहे. तसेच या सर्व घडामोडींमागे राणेंचा हात असल्याचा आरोप करत थेट गर्भित इशारा दिला आहे. या प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेची मागणी केली होती. नितेश राणेंच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊतांनी कणकवलीतील जुन्या हत्या प्रकरणांचा उल्लेख करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे असा राजकीय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी आपण दिशा सालियान ही व्यक्ती कधी भेटली नाही, संबंध आला नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर आता खासदार राऊत यांनी या सर्व घडामोडींवरून राणेंवर आरोप केले आहेत. तसेच यामागे कोण आहे, आपल्याला माहीत असून कोठून अर्थपुरवठा होतोय, याचीदेखील माहिती असल्याचे ते म्हणाले. तसेच आपल्या संयमाचा बांध फुटला तर मोठे खुलासे होतील असे म्हटले आहे.

Disha Salian Case; nitesh rane and Sanjay Raut
Sanjay Raut Disha Salian Case : शिवसेना कुणाची? दिशा सालियन प्रकरण अन् डिलिमिटेशनचा काय संबंध? संजय राऊतांचा मोठा दावा

ठाकरे यांच्या बदनामीसाठी नेपाळी गँगकडून फंडिंग होत असल्याचा आरोप करताना जे कोण बॅरिस्टर जास्त बोलत आहेत, त्यांची कुंडली बाहेर येईल, असा इशारा दिला आहे. तसेच सध्या ठाकरेंवर जी चिखलफेक करण्याचा प्रकार सुरू आहे, तो काही बेवड्यांचा आणि काही उरबडव्यांचा आहे. त्या मुलीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी झाला. पण जी व्यक्ती कधी भेटलीच नाही, ओळखत नाही, कधी संबंधही आला नाही, त्याच्यावर चिखलफेक का करता? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले आहेत.

Disha Salian Case; nitesh rane and Sanjay Raut
Sanjay Raut: कर्करोग अन् ऑर्थर रोड तुरुंगाचा संबंध! संजय राऊतांनी केला खळबळजनक दावा

याचवेळी राऊत यांनी कोकणातील काही जुन्या राजकीय हत्यांचा उल्लेखदेखील केला. त्या प्रकरणांची कुंडलीच उघड करत कणकवलीतील गेल्या 20 वर्षांत जेवढे खून झाले, ज्यात गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे, नाईक आणि किती नाव घ्यायची? राणेंच्या हाताला, अंगाला आणि जिभेला रक्त लागल्याचा आरोप करताना खून पचवण्यासाठी आणि खून दाबण्यासाठी, तुम्हाला सत्तेची गरज लागते, असा खळबळजनक आरोप मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता राऊतांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com