Konkan News : आमदार भरत गोगावलेंच्या कट्टर समर्थकाच्या हत्येप्रकरणी कंटेनर चालकाला जन्मठेप

शिवपती याने कालगुडे यांच्या अंगावर कंटेनर घातला होता. त्यात डोक्याला गंभीर इजा होऊन कालगुडे यांचा जागीच मृत्यू झाला होता.
Suresh Kalgude
Suresh KalgudeSarkarnama

महाड (जि. रायगड) : रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे (ZP) माजी विरोधी पक्षनेते (opposition leader) सुरेश कालगुडे (Suresh Kalgude) यांच्या हत्येप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. महाडचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawle) यांचे कट्टर समर्थक असणारे कालगुडे यांची चार वर्षांपूर्वी अंगावर कंटेनर घालून हत्या करण्यात आली होती. (Driver to life imprisonment in murder of Raigad ZP former opposition leader Suresh Kalgude)

महाड औद्योगिक क्षेत्रातील झुआरी अ‍ॅग्रोकेमिकल्स लिमिटेड या खतनिर्मिती कारखान्यात कालगुडे यांचा जेसीबी भाड्याने लावण्यात आला होता. ता. ३१ डिसेंबर २०१८ रोजी मध्यरात्री जेसीबीचा चालक भारत कदम याला कारखान्याच्या आवारातच शिवपती सुभोगलाल पटेल या कंटेनर चालकाने मारहाण केली होती. त्याने याबाबत माहिती कालगुडे यांना दिल्यानंतर ते कारखान्यात पोहोचले होते.

Suresh Kalgude
BJP Vs Congress : राजकारण तापलं; गुंडांचा समावेश असलेली भाजपची संभाव्य उमेदवारी यादी काँग्रेसने केली ‘लिक’

कारखान्याच्या आवारातच सुरेश कालगुडे आणि कंटेनर चालक शिवपती पटेल यांच्यामध्ये वादावादी झाली होती. यामध्ये शिवपती याने कालगुडे यांच्या अंगावर कंटेनर घातला होता. त्यात डोक्याला गंभीर इजा होऊन कालगुडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महाड औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी आरोपी शिवपतीला अटक केली होती.

Suresh Kalgude
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी भाजपलाही नकोसे झालेत : राज्यपालांना हटविण्यामागे ‘हा’ आहे डाव

या खटल्याची सुनावणी माणगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात करण्यात आली. जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. जितेंद्र म्हात्रे यांनी सरकारी पक्षाकडून काम पाहिले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एम. जहांगीरदार यांनी आरोपी शिवपतीला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व वीस हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, तसेच दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com