

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तयारी सुरू केली आहे.
महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपाबाबत इशारा दिला आहे.
कोकणात शिवसेनेचा दावा मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Raigad News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत भाकरी फिरवत राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखांच्या निवडीबाबत मोठी घोषणा केली. या घोषणेनंतर आता शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत असून शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचे वक्तव्य आता चर्चेत आले आहे. त्यांनी महत्त्वाचं विधान करताना थेट मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला.
तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अंगावर घेण्याची तयारी केल्याचे वक्तव्य केलं आहे. यामुळे रायगडमध्ये पुढील काळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये दळवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं असून कोकणात सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. आम्ही सर्व येणार्या लोकसभेसाठी सज्ज असून आमचे नेते तयारी करत आहेत, असे म्हटलं आहे.
नुकताच राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणकीच्या वेळी जिल्ह्यातील महायुतीत फूट पडली होती. काही ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपशी तर काही ठिकाणी थेट महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेशी युती केली होती. तर शिवसेनेला दूर ठेवण्याची खेळी खेळली होती. मात्र निकालात शिवसेनेला 21, राष्ट्रवादीला 16 आणि भाजपने 15 जागांवर विजय मिळवला होता.
यामुळे शिवसेना आणि भाजप मिळून सत्ता स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. तर शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्यासह इतर नेते राज्याप्रमाणेच येथेही महायुती व्हावी अशी मागणी करत होते. मात्र तटकरे यासाठी तयार नव्हते. शेवटी याचा निर्णय मुंबईत झाला आणि रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपने आपल्याकडे घेतले. तर उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीने आपल्याकडे. यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेची कोंडी झाल्याचे समोर आले होते.
यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्याच्या मनात खदखद असल्याचे बोलले जात होते. ती खदखद आता बाहेर आली आहे. आमदार दळवी यांच्याही बोलण्यातून ती आता दिसत आहे. यावेळी दळवी यांनी राष्ट्रवादीला आव्हान देणारे वक्तव्य करत खासदार सुनाल तटकरे यांना डिवचले.
दळवी यांनी, कोकणात सर्वात मोठा पक्ष आमचा असून जिल्हा परिषदेत जे झालं ते आम्ही स्वीकारलं आहे. पण आता जागावाटपात आमचा दुसरा नंबर लागेल, आम्हाला चांगलं स्थान मिळालं नाही तर आता आम्हाला गिअर बदलावे लागेल. तर तशी ताकद आमच्यामध्ये आहे, असेही आमदार दळवी यांनी म्हटलं आहे.
तसेच अशोक खरात प्रकरणावरही दळवी यांनी मोठं भाष्य केलं असून 'ज्यांनी जे केलय त्यांना भोगाव लागणार आहे. खरातला पाठिंबा देणाऱ्या लोकांवरही कारवाई होणार असून अशोक खरातने महिलांवर अन्याय केला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळल्याचेही दळवी यांनी म्हटले आहे.
याचवेळी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनीही देखील तटकरेंवर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. त्यांनी, आकाश चौधरी यांच्या सोबत असलेल्या मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांच्या भागिदारीतील कंपन्यांविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. 'जयंत पाटील यांनी दिडशे कंपन्या सांगितल्या होत्या. त्या कंपन्या डिमॉलिश कुठे झाल्या. मी बोललो तर हेडलाईन बनेल. पण ते तपासातच समोर आलेलं बरं. पण आता आरोपावर मंत्री आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे काय उत्तर देतात, हे पाहावे लागेल.
1. शिवसेना कोणत्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे?
लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे.
2. महेंद्र दळवी यांनी कोणाला इशारा दिला?
राष्ट्रवादी काँग्रेसला जागावाटपाबाबत इशारा दिला.
3. कोकणात कोणता पक्ष मजबूत असल्याचा दावा आहे?
शिवसेनेने कोकणात स्वतःचा मजबूत दावा केला आहे.
4. शिंदे यांनी कोणाला जबाबदारी दिली आहे?
डॉ. श्रीकांत शिंदे यांना मुंबई व ठाणे लोकसभेची जबाबदारी दिली आहे.
5. या घडामोडीचा परिणाम काय होईल?
आघाडीतील तणाव वाढून जागावाटपावर मोठा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.