BJP Vs Shivsena: "राणे बंधुंनी सांभाळून बोलावं अन्यथा..." निलेश राणेंच्या 'त्या' आरोपावरुन शिंदे गट आक्रमक

Eknath Shinses Shivsena Vs Rane: लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. खासकरुन कोकणातील महायुतीतील नेत्यांमध्ये खटके उडाल्याचं दिसत आहे.
Nitesh Rane, Eknath Shidne, Nilesh Rane
Nitesh Rane, Eknath Shidne, Nilesh RaneSarkarnama

Bharat Gogawale On Nilesh Rane: लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. खासकरुन कोकणातील महायुतीतील नेत्यांमध्ये खटके उडाल्याचं दिसत आहे. आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत, राणे कुणाला माफ करत नाहीत, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यावर गंभीर आरोप कले. त्यांच्या या आरोपांना आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात किरण सामंत हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरेंना भेटल्याचा दावा करतच उदय सामंत यांनी आम्हाला लीड का दिलं नाही? असा प्रश्नही निलेश राणेंनी उपस्थित केला. त्यामुळे राणेंनी सामंत बंधुंनी आपलं काम केलं नसल्याचा आरोप केल्याचं स्पष्ट दिसत आहे. इतकंच नव्हे तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ मतदारसंघावर दावा देखील केला आहे. निलेश राणेंच्या या विधानावरुन आता महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तर आता शिंदे गटातील नेतेही राणेंच्या वक्तव्यावरुन आक्रमक झाले आहेत.

राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी राणे बंधुंना इशारा दिला. ते म्हणाले, "निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या चर्चा आमच्या कानावर आल्या, या चर्चा पुर्ण चुकीच्या आहेत. नारायण राणेंना तिकीट मिळताना अनेक अडचणी होत्या. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समजूत घातल्यामुळे त्यांना तिकीट मिळाले. राणेंना मिळालेली 74 हजार मते ही आमची आहेत. किरण सामंत यांचं तिकीट डावलून आम्ही त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे राणे बंधूंनी बोलताना सांभाळून बोलावे, अन्यथा पुढच्या पदवीधर निवडणुकीबाबतीत आम्ही योग्य तो विचार करु"

Nitesh Rane, Eknath Shidne, Nilesh Rane
Bhavana Gawali : राजश्री पाटलांच्या पराभवानंतर गवळींची खदखद बाहेर; म्हणाल्या, "...तर सहाव्यांदा खासदार झाले असते"

तसंच आमचाही काही ठिकाणी पराभव झाला. तिथे आम्ही दावा करत बसलो नाही. मात्र जे झालं ते आम्ही मान्य करतो. आम्हालाही याची कल्पना आहे. संविधान बदलेल या भीतीने मुस्लिम , बहुजन समाजाने ज्या भागात मोदींना नाकारलं, त्याचा फटका निश्चित बसला. परंतु याचा अर्थ असा नाही की, आम्ही पूर्वीचा पारंपारिक मतदारसंघ आता ताब्यात घेऊ. हे विचार राणे बंधूंनी डोक्यातून काढून टाकावे, अन्यथा आम्ही देखील पुढचा विचार करू, असं सूचक वक्तव्य गोगावले यांनी केलं. त्यामुळे कोकणातील नेत्यांचं मनोमिलन करण्यात युतीतील वरिष्ठांना यश येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com