Sharad Pawar Politics : महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शरद पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर, काँग्रेस नेत्यांना फोन...

Sharad Pawar MVA Crisis Congress : ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडी फूटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शरद पवारांनी हातात सुत्रं घेतली असून काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती आहे.
Sharad Pawar speaking to Congress leaders amid efforts to save the Maha Vikas Aghadi alliance.
Sharad Pawar speaking to Congress leaders amid efforts to save the Maha Vikas Aghadi alliance.sarkarnama
Published on
Updated on

BMC Election : आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवीन समीकरणे उदयाला येत आहेत. ठाकरे बंधू एकत्र येत असताना काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फूटणार हे निश्चित झाले आहे. मात्र, महाविकास आघाडी टिकवण्यासाठी शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर आल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी भेट घेतली होती. या भेटी दरम्यान मुंबई महापालिका निवडणूक कशी लढायची याची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शरद पवारांनी काँग्रेस नेत्यांना फोन केल्याची माहिती आहे.

मुंबईत महाविकास आघाडी म्हणून लढायचे की स्वबळावर याबाबत महाविकास आघाडीत निर्णय झालेला नाही. सोमवारी किंवा मंगळवारी महाविका आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीबाबत चर्चा होणार आहे.

भाजपला रोखण्याठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र राहिले पाहिजे, अशी शरद पवारांची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडी टिकवून भाजप विरोधात लढण्याची ते प्रयत्नशिल असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला ठाकरे बंधूंसोबत आघाडी नको आहे. त्यामुळे यावर शरद पवार कशा तोडगा काढणार याची देखील चर्चा होत आहे.

Sharad Pawar speaking to Congress leaders amid efforts to save the Maha Vikas Aghadi alliance.
Maharashtra Government : आमदार-खासदारांचा मानमरातब राखण्यासाठी राज्य शासनाचा नवा जीआर; अधिकाऱ्यांना आता उभं राहून अभिवादन करावं लागणार

काँग्रेसला हवी शरद पवारांसोबत युती

काँग्रेस नेत्यांनी ठाकरे बंधूसोबत युती नको, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, समविचारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत युती करण्यास काँग्रेस नेते आग्रही दिसत आहेत. समविचारी पक्षांमध्ये मतांची फाटाफूट नको, असे सांगत शरद पवारांच्या पक्षासह, आरपीआयचे विविध गट, समाजवादी पक्ष यांच्यासोबत युती करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत.

Sharad Pawar speaking to Congress leaders amid efforts to save the Maha Vikas Aghadi alliance.
BJP President : भाजप अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा; बिहार निवडणुकीची डेडलाईन संपली, 'ही' नावे चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com