गणेश नाईकांना शह देण्यासाठी अजित पवार मैदानात

गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला संघर्ष करावा लागत आहे.
Ganesh Naik, Ajit Pawar
Ganesh Naik, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

नवी मुंबई : अगामी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणून भाजप नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी शक्तिप्रदर्शन केले. तर राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांना नवी मुंबईत आणून गणेश नाईक यांना शह देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात आहे.

Ganesh Naik, Ajit Pawar
फडणवीसांच्या भेटीनंतर दोन तासात साबणेंना अधिकृत उमेदवारी

त्यामुळे नवी मुंबईत अजित पवार दौरा करत आहेत. गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादीला संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी अजित पवार, शशिकांत शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून केली जात आहे. गणेश नाईक यांना शहा देण्याची जोरदार तयारीही राष्ट्रवादीकडून केली जात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या १११ जुन्या प्रभागांचे नव्याने ३७ प्रभाग तयार केले जाणार असून त्यांची रचना भौगलिकट्या केली जाणार आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांचा निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे. मतदारांची संख्या सुमारे ८ लाख ५० हजार आहे.

अनेक मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग जाणार

निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभाग रचनेत बदल होणार असल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. शिवाय नवाने प्रभाग रचना होणार असल्याने नव्या सोडतीत कुठला प्रभाग येतो त्यावर उमेदवार रिंगणात उतरण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना बदलल्याने त्यांनी आतापासून शेजारच्या प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.

Ganesh Naik, Ajit Pawar
अमित शहा सहकारमंत्री झाल्यानंतर काय करतील? : शरद पवारांनी केले भाकीत

एकच मतदार तीन उमेदवारांना मतदान करु शकेल. पूर्ण पॅनल निवडून आणण्यासाठी उमेदवारांना आणि त्या पक्षाच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. एक सदस्य असताना कुठलीच अडचण येत नव्हती. मात्र आता उमेदवारांना तीन प्रभागातील मतदारांपुढे मत मागण्यासाठी जावे लागेल, असे पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये मोठी गटबाजी आहे. शिवसेना नेते मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीला विचारत नाहीत. त्यामुळे महालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल की नाही हे सांगता येत नाही, असे शिवसेनेचे नेते सांगत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com