अमित शहा सहकारमंत्री झाल्यानंतर काय करतील? : शरद पवारांनी केले भाकीत

सहकाराच्या मजबूतीसाठी आता भांडणाचीही वेळ उभी ठाकली आहे. तशी तयारी ठेवण्याचा आवाहनही पवार यांनी केले.
Sharad Pawar- Amit Shaha
Sharad Pawar- Amit Shaha Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्याशी पहिली ओळख ही अहमदाबाद (Ahamdabad) सहकारी बँकेचे संचालक म्हणून झाली आहे. सहकारात काम केलेल्या व्यक्तीकडे आता केंद्रीय सहकार खात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यामुळे ते सहकाराची जपणूक करतील अशीच भूमिका घेतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात व्यक्त केली. महाराष्ट्रासह देशातील सहकाराच्या अडचणी त्यांच्या कानावर घालून उपाय काढण्याचा प्रयत्न करु, असा शब्दही पवार यांनी दिला. सहकाराच्या मजबूतीसाठी आता भांडणाचीही वेळ उभी ठाकली आहे. तशी तयारी ठेवण्याचा आवाहनही पवार यांनी केले.

Sharad Pawar- Amit Shaha
अमली पदार्थ म्हणजे काय, कुठे होते त्यांचे उत्पादन?

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित सहकार महापरिषदेत ते बोलत होते. सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर, सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. नागरी बँका, सहकारी बँका, मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकाची स्थिती, त्यांच्यासमोरील आव्हाने, सहकार क्षेत्रासमोरील अडथळ्यांची कारणे, याचाही उहापोह पवार यांनी केला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकासह राज्यातील चांगली कामे करणाऱ्या बँकाच्या कामाबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले.

केंद्र सरकारने नव्याने काढलेल्या सहकार खाते आणि त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आल्यानतंर उलटसुलट चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी शहा हे सहकाराच्या क्षेत्राची जाण असलेले मंत्री आहेत, असे सुचित केले.

पवार म्हणाले, 'रिझर्व बँकेने गेल्या काही वर्षापासून सहकारी बँकासाठी परवाने दिलेले नाहीत. त्याशिवाय त्यांच्या शाखा विस्तारासाठीही काही केले नाही. नियम कडक करताना गाजावाजा केला याचा परिणाम या सहकार क्षेत्रावर झाला आहे. नियमांना विरोध नाही. अशा धोरणांमुळे सत्तेचा गैरवापर होत असल्याचा समज लोकांमध्ये आहे. सहकारी बँकाच्या अधिकारांवर गदा येत आहे आणि त्यासंबंधी रिझर्व बँका ऐकायला तयार नाहीत. एखाद्या क्षेत्राच्या वाढीला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली पाहिजे'.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com