Narayan Rane : 'माझी परवानगी घ्यावी लागेल' म्हणणारे राणे खासदार की शिवसेनेचे संपर्कप्रमुख? ठाकरे शिवसेनेनं डिवचलं

Thackeray Shivsena -UBT : सध्या राज्याच्या राजकारण कधी काय होईल आणि कोण कोणाचा मित्र होईल हे सांगता येत नाही. दरम्यान शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिलेल्या ऑफरवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शिवसेना विरोधात शिवसेना असा समना रंगला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यात जोरदार वाद उफाळला आहे. तर दरम्यान वैभव नाईक यांना शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवर भाजपने आपला रोख स्पष्ट केला आहे. भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी यावरून अक्षेप घेतला होता. याच अक्षेपावर आता ठाकरे गटाने खोचक टीका करताना राणे खासदार की शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख? असे म्हणत डिवचलं आहे. यामुळे आता शिवसेना विरूद्ध भाजप असा वाद सुरू झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या बिडवलकर हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यात जोरदार वाद उफाळला आहे. तर कोकण अशांत करण्यात वैभव नाईक यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्या निलेश राणेंचा उल्लेख आका असे वैभव नाईक यांनी केला होता. यामुळे येथील राजकीय तापमान वाढले होते.

दरम्यान कुडाळ येथी एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकण अशांत करू नका असे आवाहन वैभव नाईक यांच्यासह निलेश राणेंना केलं होतं. तर मंत यांनी वैभव नाईक यांना शिवसेनेची ऑफर दिली होता. फक्त ऑफरच दिली नाही. तर निलेश राणेच स्वागत करतील असे म्हटले होते. ज्यावर नारायण राणे यांनी पलटवार करताना, सामंत आमचे सल्लागार नाहीत. सिंधुदुर्गात आमच्या परवानगीशिवाय कुणालाही महायुतीत प्रवेश मिळणार नाही, असा सज्जड दम भरला होता.

Narayan Rane
Narayan Rane : राज अन्‌ उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची राणेंनी उडविली खिल्ली; म्हणाले, ‘राजकारणात संपलेल्या दोन व्यक्ती...’

यावरून आता ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी नारायण राणे हे शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की भाजपचे खासदार, हे त्यांनी प्रथम जाहीर करावे, असा टोला लगावला आहे. तसेच कोण कुणाला भेटतो, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न असून शिंदे शिवसेनेत कोणाला प्रवेश करायचा असल्यास राणेंची परवानगी कशाला घ्यावी लागेल. याच्याआधी नारायण राणेंनी जेव्हा 2005 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवली तेंव्हा केवळ शंभर कार्यकर्ते सोबत होते. ते भाजपमध्ये गेले तेव्हा शिंदेंना भेटत होते. यामागे थोरल्या मुलाचे पुनर्वसनाचे कारण होते. पण आम्ही असं कधीच करत नाही. शिंदेंना भेटलो नाही.

पण लॉन्ड्रिंगचा आरोप झाला तेंव्हा काँग्रेसमध्ये असणारे थेट गुजरातला गेले होते. तेथे कुणाची भेट घेतली? तर काँग्रेसमध्ये जाताचा त्यांचा मार्ग शरद पवारांपासून मार्गारेट अल्वा, प्रभा राव यांच्यापर्यंत पोहचला होता. ते या लोकांना भेटत असल्याचा आरोपही उपरकर यांनी केला आहे.

Narayan Rane
Narayan Rane : उदय सामंतांचा डाव राणेंनी दोनच शब्दात उधळला, म्हणाले, 'त्याचं ऐकायला तो काही आमच्या घराचा...'

नारायण राणे यांनीच आतापर्यंत चार पक्ष बदलले असून शिंदे शिवसेनेमध्ये कोणाला घ्यावे आणि कोणाला नको हे सांगण्याची त्यांची जबाबदारी नाही. ते अधिकार शिंदेंकडे आहेत. तर आता त्यांच्यामुळे भाजपमधील अनेक नाराज भाजपमधून शिंदे शिवसेनेमध्ये जात आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे. तर नीतेश राणेंच्या पक्षप्रवेशासाठी राणेंना अडीच तास वाट पाहावी लागली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले नाहीत. शेवटी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते त्यांचा भाजपप्रवेश झाला होता असाही टोला ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी नारायण राणेंना लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com