Narayan Rane : राज अन्‌ उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची राणेंनी उडविली खिल्ली; म्हणाले, ‘राजकारणात संपलेल्या दोन व्यक्ती...’

Raj and Uddhav Thackeray Wlii Coming Together : दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी माझ्या घरी अनेक पत्रकार येऊन गेले.पण, मला त्यावर भाष्य करायचं नाही, असं मी त्यांना सांगितलं.
Uddhav Thackeray-Raj Thackeray-Narayan Rane
Uddhav Thackeray-Raj Thackeray-Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 27 April : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत एकत्र येण्याबाबत भाष्य केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी या दोन्ही भावांनी राजकारणात एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काहींनी मात्र ते एकत्र येणार नाहीत, असेही म्हटले आहे. त्यावर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया आली असून राजकारणात संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? असा सवाल उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील जनता तुमच्या एकत्र येण्याची वाट बघतेय... उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र या, अशा आशयाचा बॅनर मातोश्रीबाहेर लावण्यात आलेला आहे. त्याबाबत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राणे नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) घसरले, तर राज ठाकरे आमचे मित्र आहेत, असे म्हणून त्यांच्याबाबत सांभाळून बोलले.

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, कोण एकत्र येणार? काय आहे का? कोणी कोणाला आवाहन केलं. ते देणारे कोण आहेत, ते त्यांचंच दुकान आहे. तसं आवाहन करणारी त्यांचीच माणसं आहेत ती. मी अजून त्यावर भाष्य केलेलं नाही. दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी माझ्या घरी अनेक पत्रकार येऊन गेले.पण, मला त्यावर भाष्य करायचं नाही, असं मी त्यांना सांगितलं.

Uddhav Thackeray-Raj Thackeray-Narayan Rane
Sanjay Gaikwad Statement : फडणवीसांनी डोळे वटारताच शिंदेंचा गायकवाडांना फोन; कडक शब्दांत दिली तंबी, गायकवाडांची दिलगिरी; पण...

अरे दोन भाऊ एकत्र यायला आम्हाला नको का? या... एकत्र या. ते राजकारणात सक्रीय आहेत. आता राजकारणात संपलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन काय होणार? काय आहे आता त्यांच्याकडे. वीस झाले हो (शिवसेनेचे) आमदार. पुढच्या निवडणुकीत त्यांचे (उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे) पाचही नसणार. पाचही आमदार निवडून येणार नाहीत, असा दावाही नारायण राणेंनी केला.

Uddhav Thackeray-Raj Thackeray-Narayan Rane
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात महत्वपूर्ण घडामोड आली पुढे; डॉक्टरांची म्युच्युअल फंडात 160 कोटींची गुंतवणूक;कोणाला मिळणार परतावा?

दुसऱ्याकडे (मनसे प्रमुख राज ठाकरे) काहीच नाही. ते आमचे मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. पण त्यांचे वीस आमदार व्हावेत आणि यांचे पाच. बस्स पंचवीस, असे म्हणून नारायण राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com