

भास्कर जाधव यांनी कदम कुटुंबाशी असलेली कटुता कमी करण्याचे संकेत दिले.
त्यांनी विधानसभेत सकारात्मक टिप्पणी करत वैयक्तिक आणि राजकीय भांडण वेगळे असल्याचे सांगितले.
कोकणातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
Ratnagiri Political News: नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडी झाल्या. शिवसेनेच्या मंडणगडच्या सदस्या अस्मिता केंद्रे यांना अध्यक्ष तर संगमेश्वरचे ज्येष्ठ सदस्य विलास चाळके यांना उपाध्यक्ष देण्यात आले आहे. यावेळी मात्र गुहागरच्या नेत्रा ठाकूर यांचे चर्चेत असलेले नाव मागे पडले आहे.
पण त्यांना सव्वा वर्षानंतर संधी देवून शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी घेरण्याची रणनीती माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे पुत्र राज्यमंत्री योगेश कदम यांनी आखल्याची चर्चा होती. यामुळे भविष्यात कदम पिता-पुत्र आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भास्कर जाधव यांनी कदम पिता-पुत्रांबाबत सकारत्मक टिप्पणी करत कटुता कमी झाल्याचे संकेत दिले आहेत.
त्यांनी, माझे भांडण तुमच्या वडिलांशी आहे, ते सुरूच राहील पण माझा मुलगा तुमच्या वडिलांविरोधात काही बोलतोय असे घडणे नाही, असे विधान बुधवारी (ता.१९) विधानसभेत केले. यामुळे आता कोकणात भास्कर जाधवांची साखरपेरणीला सुरूवात झाली असून कदमांसोबतच्या तब्बल 25 वर्षांच्या राजकीय वादाला संपवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या सुरूवातीपासून रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यात राजकीय वैर्य असून ते आजही कायम आहे. तर वेळोवेळी यांच्यातला वाद उपाळून येताना दिसतो.
नुकताच मुंबईतील बार वादातून देखील रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील राजकीय वैराला उकळी फुटली होती. ज्यात भास्कर जाधवांनी रामदास कदम यांच्यावर बामदास आणि छमछम अशी तीव्र टीका केली होती. तर कदम यांनी प्रत्युत्तर देत भास्कर जाधवांना “नाचा” म्हणत परंपरागत टोला लगावला होता.
मात्र आता कदमांसोबतच्या तब्बल 25 वर्षांच्या राजकीय वादाला मुठमाती देत कटुतेची रेषा पुसट करण्याचे काम जाधव करताना दिसत आहेत. नुकताच त्यांनी सभागृहात याबाबत संकेत दिले. ते म्हणाले, योगेश काल मला भेटला.
हो सभागृहाबाहेर मी त्याला अरे कारेच म्हणणार. आज सभागृहात ते आहेत तेव्हा 'अरे कारे' म्हणणार नाही. तुमचे वडील आणि माझे भांडण हे राजकीय असून ते राहील. ते आम्ही करत राहू, भांडत राहू. राजकीय भांडण आमच्या पाचवीलाच पूजलेले आहे.
पण तुमच्या विषयी अशी भावना माझ्या मनात नाही. मुंबईसह कोकणचे ७५ आमदार, मंत्री आहेत. त्यांनी कोकणच्या प्रश्नांवर सातत्याने एकत्र आले पाहिजे असे आवाहन करत जाधवांनी कदम कुटुंबाशी असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
तसेच त्यांनी कोकणला २० हजार कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. तर या मदतीतून स्थानिक समस्या सोडण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी चर्चा केली. यावेळी आमदार संजय केळकर, मनीषा चौधरी, बाळा नर, सुनील प्रभू यांनी कोकणातील विविध प्रश्न मांडले.
यावेळी भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवालय राजकीय भेदभाव करत असल्याचा दावा करत गंभीर आरोप केले. विधानमंडळ सचिवांनीच विधानसभेत विरोधकांचा प्रस्ताव आला तर तो नाकारावा असे गृहीत धरले आहे.
त्यांना वाटते की विरोधक सरकारवर टीका करतील. यामुळे सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तर कोकणासंदर्भात चर्चा होण्यासाठी मान्य झालेला प्रस्ताव नाकारल्याने त्यांनी हा आरोप केला.
1. भास्कर जाधव यांनी काय विधान केले?
त्यांनी कदम कुटुंबाशी वैयक्तिक वैर नसल्याचे सांगत कटुता कमी करण्याचे संकेत दिले.
2. कोणत्या नेत्यांबाबत हे विधान आहे?
रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याबाबत हे विधान आहे.
3. हा वाद किती जुना आहे?
हा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे.
4. जाधवांनी काय आवाहन केले?
कोकणातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवावेत असे आवाहन केले.
5. या विधानाचा राजकारणावर काय परिणाम होईल?
यामुळे कोकणातील राजकीय वातावरण सौम्य होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.