Gram Panchayat Election Results : "...म्हणून शरद पवार गटाची ही अवस्था", मुश्रीफांनी ग्रामपंचायत निकालावरून लगावले टोले

Gram Panchayat Election 2023 Result Hasan Mushrif Reaction : ग्रामपंचायात निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने १०० हून अधिक ठिकाणी वर्चस्व मिळवत विरोधकांना धक्का दिला आहे....
Sharad Pawar, Hasan Mushrif
Sharad Pawar, Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Gram Panchayat Election Results : ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट टोले लगावत आगामी निवडणुकीत महायुतीची घोडदौड कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळाल्याचा दावा मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या ताब्यात सर्व ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना एकही ग्रामपंचायत राखता आली नाही. त्यावर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांकडे आल्याने शरद पवार गटाची ही परिस्थिती झाली असावी, असं आम्हाला वाटतं', असे विधान केले.

Sharad Pawar, Hasan Mushrif
Gram Panchayat Results : शहाजीबापूंनी गावची सत्ता राखली; पण तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचे झाल्यास 144 पेक्षा जास्त आमदार निवडून आणावे लागतील. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, आमची तशीच भावना आहे. विधानसभेला राष्ट्रवादीकडून पाच जागांची मागणी केलेली आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे दोन उमेदवार आहेत. महायुतीची जी चर्चा होईल, त्यासोबत राष्ट्रवादी राहील. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी जिवाची बाजी लावेल. असे सांगत राज्यात सहाशेपेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर महायुतीने कब्जा केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या तिप्पट जागा निवडून आल्या असल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

आगामी सर्व निवडणुकीत महायुती अशाच पद्धतीने यश मिळवेल. आजरा, चंदगड, राधानगरी हे मतदारसंघ राष्ट्रवादीचे आहेत, तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी हा चांगला आणि सेक्युअर पक्ष राहिलेला आहे.

एकरकमी एफआरपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने पूर्ण देतात. दोन वेळा याबाबत बैठक घेण्यात आली आहे. गेल्या वर्षीची मागणी पूर्ण करता येणार नाही. हे बैठकीत सांगितले आहे. राजू शेट्टी यांनीसुद्धा कारखान्यांना सहकार्य करावे, अशी भूमिका मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली.

Sharad Pawar, Hasan Mushrif
Gram Panchayat Election Results : एकच वादा अजितदादा! राज्यात अजित पवार गटाचा डंका; इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांना धक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com