खोपोली (जि. रायगड) : खालापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. नगरसेवकांची १७ संख्या असलेल्या या नगरपंचायतीत सर्वाधिक आठ नगरसेवक निवडून आलेला शिवसेना (shivsena) नंबर एकचा पक्ष आहे. शिवसेनेकडून नगराध्यक्षसहित सत्ता स्थापन करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, शिवसेनेला त्यासाठी दोन नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. ((In the role of NCP Kingmaker in Khalapur mayoral election))
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) दोन नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येत नसल्याने येथील नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत खालापुरात शिवसेना आठ, शेकाप सात व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जिकडे त्यांची सत्ता व नगराध्यक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान पाली व माणगावमधील राष्ट्रवादीचे सत्ता समीकरण मजबूत ठेवण्यासाठी खालापुरात शेकपला मदत करावी, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, स्थानिक पातळीवर आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्यातील संघर्ष खालापुरात शिवसेनेची सत्ता स्थापण्यात अडचण ठरत असल्याचेही चर्चा आहे.
अशा विचित्र परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस खोपोली पालिका निवडणूक व जिल्हा स्तरावर गणिते बिघडू नयेत, तसेच आपल्या पारड्यात जो अधिक देईल, त्याला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान सुरुवातीला विरोधात बसण्याच्या तयारीत असलेल्या शेकापचे नेतेही खालापुरात ऐनवेळी राजकीय गणिते बदलण्यासाठी चमत्कार करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.