'त्याच ठिकाणी १५ दिवसांत सभा घेणार; दम असेल तर केसाला धक्का लावून दाखवा'

लोकशाहीत एखादा विचार पटला नाही, म्हणून मी दुसरीकडे गेलो. म्हणून काय ठार मारायचं? : उदय सामंत
Uday Samant
Uday SamantSarkarnama

रत्नागिरी : ज्या ठिकाणी (पुणे शहरातील कात्रज चौकात सामंत यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.) उदय सामंतवर (Uday Samant) हल्ला झाला, त्याच ठिकाणी पुढच्या १५ दिवसांत मी एकटा जाऊन सभा घेणार आहे. कुणाच्यात दम आहे, त्यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं, असे खुले आव्हान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला (shivsena) दिले आहे. (Industry Minister Uday Samant's challenge to Shiv Sena)

Uday Samant
शिंदे गटात जाणार...? राजन साळवी म्हणाले, ‘मला खोक्याची गरज...’

रत्नागिरी येथे गोकुळ जन्माष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना उद्योगमंत्री सामंत यांनी शिवसेनेला इशारा दिला. ते म्हणाले की, मी १९९९ पासून राजकारणात रत्नागिरीमधील जनतेच्या आधारावर आणि आशीर्वादावर काम करत आहे. दुःख फक्त एवढंच वाटलं की, माझ्यावर अनेकदा टीका झाली. पण मी कुणालाच भीक घातली नाही. माझ्यावर हल्ला झाला. टीव्हीवर फक्त तीन मिनिटांचीच क्लिप दाखवली. पण ती सात मिनिटांची क्लिप आहे. मला विश्वास होता की, भैरीदेवाचा आशीर्वाद आणि रत्नागिरीची जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत माझ्या केसालादेखील धक्का लागणार नाही. म्हणून या रत्नागिरीच्या जनतेच्या साक्षीने सांगतो की, ज्या ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला. त्याच ठिकाणी पुढच्या १५ दिवसांत मी एकटा जाऊन सभा घेणार आहे. कुणाच्यात दम आहे, त्यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं.

Uday Samant
‘ठाकरेंना चार दिवस विनवणी केली, अखेर पाचव्या दिवशी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला’

लोकशाहीत एखादा विचार पटला नाही, म्हणून मी दुसरीकडे गेलो. म्हणून काय ठार मारायचं? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बंडखोरासंदर्भात बोलताना ‘बंडखोरांनी आपल्या आईचं दूध विकलं,’ अशी भाषा वापरली. ती बोलायला ठीक आहे. माझ्यासारखाच प्रत्येकाला आपल्या आई-वडिलांबद्दल अभिमान असेल. म्हणून मी काही लोकांना सांगितलं आहे. घडलेल्या घटनेबद्दल मी बोललो नसेन. शांत बसलो असलो तरी ते सर्व माझ्या डोक्यात ठेवले आहे. त्याचे उत्तर एप्रिल २०२४ मध्ये देणार आहे. ते जर मी दिले नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे या रत्नागिरीच्या जनतेसमोर मी सांगतो. मी मैदानात येऊन सामना करणारा माणूस आहे, असेही त्यांनी शिवसेनेला ठणकावून सांगितले.

Uday Samant
सरकार बदलूनही बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा वनवास संपेना!

शेवटी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला

गुवाहाटीला जातानाही मी काही मागच्या दाराने गेलो नाही. बंडानंतर चार दिवस राज्यात थांबलो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चार दिवस सांगत होतो. एकनाथ शिंदे यांच्यासारखा चांगला माणूस शिवसेना सोडून जात आहे, त्यांना थांबवलं पाहिजे, अशी चार दिवसं ठाकरे यांना विनवणी करत होतो. पाचव्या दिवशी मी स्वतः सांगितलं की, साहेब आपण कोणी जोडण्याचं काम करत नाहीत. शिंदे यांच्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. त्यांच्यासभोवती असणाऱ्या लोकांनी शिंदेंना ठाकरे यांच्या जवळ येऊ दिले नाही; म्हणून मलादेखील गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com