Aditya Thackeray : गेम झाल्यानेच विधानभवनात गद्दार नजर मिळवत नव्हते....

Uddhav Thackeray यांना एकटे पाडण्याचा डाव असल्याचा आदित्य यांचा आरोप!
Eknath Shinde, Aditya Thackeray
Eknath Shinde, Aditya Thackeraysarkarnama

अलिबाग : गद्दारांचे विधानभवनात आम्ही चेहरे बघत होतो. सगळे चेहरे लपवून चालत होते. गेम झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होतं म्हणून नजर मिळवत नव्हते, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला लगावला.

आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अलिबागमध्ये शिवसंवाद यात्रा काढण्यात आली होती. अलिबागमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांवर टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, सरकारमधून बाहेर पडल्याचे मला दु:ख नाही. पण, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी आपण दिवसरात्र मेहनत घेऊन प्रचार केला, निवडून आणले.

Eknath Shinde, Aditya Thackeray
अर्णव गोस्वामीच्या निमित्ताने अलिबाग न्यायालयात घडला असाही `इतिहास`

निवडून आणल्यानंतर सरकार जपायचे असते. सरकारमध्ये असताना मंत्रिपद यांना पाहिजे असते. त्यांच्या स्वार्थासाठी आपण सगळे करत गेलो. आपण पाहिले हे नेते गोव्यात गेले तेव्हा त्या हॉटेलमध्ये टेबलवर नाचत होते. राज्यात उपमुख्यमंत्री हे खरे मुख्यमंत्री आहेत. मंत्रीमंडळ जाहिर व्हाययला ४१ दिवस लागले. या मंत्री मंडळात रायगडचं कोणी नाही, मु़बईचं कोणी नाही, महिलांना स्थान नाही. खाते वाटप १८ मध्ये झालंय, अशी टीका त्यांनी केली.

Eknath Shinde, Aditya Thackeray
मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्याला पत्र...!

हे गद्दारांचे सरकार आहे कोसळणार म्हणजे कोसळणारच, असे सांगून ते म्हणाले, यांना दुय्यम खाती मिळाली, आता पश्चाताप तोंडावर दिसतोय. उठाव करायला तागद लागते यांनी पळून जाऊन गद्दारी केलीत हे खरे शिवसैनिक असते तर गुवाहटीत डो़ंगर, हॉटेल बघितले नसते तर आसामच्या पुरात मदतीला उतरले असते. तिकडे खायला अन्न नव्हते. मदत हवी होती, शिवसैनिक असते तर मदत करायला उतरले असते.

Eknath Shinde, Aditya Thackeray
`वंदे मातरम`चा इतका द्वेष का? मुनगंटीवारांच्या मदतीला फडणवीस धावले...

आज ही एकच म्हणणं आहे, तुमच्यावर दडपण असेल कोणी काही बोलणार नाही. जर तुम्हाला तेथे आनंदात रहायचं असेल, लाज उरली असेल तर राजीनामे द्या निवडणुकीला सामोरे जा. होऊन जाऊ देत. जनता कुणाला कौल देईल तो मला मान्य असेल. अजून ही काहींना वाटत असेल आपण चुकलो त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असे त्यांनी स्पष्ट केलं.काहींना असे ही वाटत असेल आपण राक्षसी माणसावर विश्वास ठेवला. त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्याने या ४० जणांना सोबत घेतलं.

Eknath Shinde, Aditya Thackeray
मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्याला पत्र...!

हे निर्लज आणि गद्दार तुमचे नेते होऊ शकतात का, तुमचे आमदार होऊ शकतात का, तुमचे लोकप्रतिनिधी होऊ शकतात का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. शिवसेनेला फोडा मराठी हिंदुमध्ये फूट पाडा. ठाकरेंना एकटे पाडा, हीच त्यांची इच्छा आहे. जे तुम्ही होऊ देणार नाही याची मला खात्री आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com