`वंदे मातरम`चा इतका द्वेष का? मुनगंटीवारांच्या मदतीला फडणवीस धावले...

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या घोषणेवर विरोधी पक्षांनी टीका केली होती.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis : मुंबई : महाराष्‍ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्‍हणता वंदे मातरम् म्‍हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्‍याचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली होती. त्यावरुन आता वाद सुरु झाला होता. या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीकेची झोत उठवल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांनी हॅलो ऐवजी `वंदे मातरम` म्हणा असे सांगितले आहे. मात्र, यांना `वंदे मातरम` बाबत इतका द्वेष का आहे, असा सवाल त्यांनी केला. 'वंदे मातरम'ला विरोधावरुन यांची मानसिकता दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
शिवसेनेचे चाणक्य मानले जाणारे बसले कोपऱ्यातील खुर्चीवर!

दरम्यान, मुनगंटीवार यांच्या घोषनेवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर `वंदे मातरम` म्हणने सक्तीचे नसल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी `यू टर्न` घेतला होता. त्यामुळे हा निर्णय वादात सापडला आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
भाजपच्या खात्यांना जास्त निधी? फडणवीसांनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितले

पत्रकार परिषदेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत विरोधकांना लक्ष्य केले. खाते वाटपानंतर काही तासातच मुनगंटीवार यांनी हा निर्णय घोषीत केला होता. मात्र, विरोधकांच्या टीकेनंतर हा शिंदे सरकारचा हा निर्णय वादात सापडला आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही हा प्रश्न गाजणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com