Jitendra Awhad News: मोठी बातमी! महाडमधील आंदोलन भोवणार ? जितेंद्र आव्हाडांसह 24 जणांविरोधात गुन्हा दाखल

Mahad Protest News : राज्य सरकारच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आव्हाडांसह एकूण 24 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jitendra Awhad News
Jitendra Awhad NewsSarkarnama

Mahad News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 23 जणांवर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात राज्य सरकारविरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

मात्र, याचवेळी आव्हाडांकडून मनुस्मृती पुस्तकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडण्यात आला. आता त्यांच्या या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असतानाच त्यांच्याविरोधात राजकीय वातावरण तापू लागले आहे.

Jitendra Awhad News
Vasant More News: धंगेकरांची प्रसिद्धी वसंत तात्यांच्या डोळ्यात खुपली? पत्रकारांना म्हणाले, "तुम्हाला फक्त रवींद्र..."

अशातच आता या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या आदेशांचे आणि अटींचा भंग केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आव्हाडांसह एकूण 24 जणांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

महाड पोलिस प्रशासनाकडून आचारसंहितेच्या भंग म्हणून नोटीस दिल्यानंतरही आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केलं. त्यांनी चवदार तळ्यावर मनुस्मृतीचे दहन करत आंदोलन केले.पण त्याचवेळी त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडण्यात आला. यावरुन नवा वाद पेटला आहे.

एरवी महायुतीवर तुटुन पडणाऱ्या आव्हाडांच्या घेरण्यासाठी अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे.आता भाजपनेही आव्हाडांविरोधात रान उठवण्यासाठी उद्या राज्यभर आंदोलन उभारणार असल्याचे जाहीर केले आहे.

याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माहिती दिली आहे. महायुतीच्या नेत्यांकडून आव्हाड यांच्यावर महाड आंंदोलनात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Jitendra Awhad News
Radhakrishna Vikhe On Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या स्टंटबाजीवर मंत्री विखेंचा संताप; शरद पवारांकडे मोठी मागणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com