Doctor Assault Case : डोंबिवलीनंतर कल्याणमध्ये डॉक्टरला मारहाण; डॉक्टर रुग्णाला समजावत होते अन् मुलाने हात सोडला; गुन्हा दाखल

kalyan Hospital Doctor Assault Case : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Kalyan hospital doctor Yogendra Jaiswal assault case
Kalyan hospital doctor Yogendra Jaiswal assault casesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतील नामांकित डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रुग्णाच्या मुलावर कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. तर विनीत देशमुख असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर या घटनेमुळे राज्यभरातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आंदोलने केली होती.

यानंतर या प्रकरणातील आरोपी आणि नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तसेच पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्राबाहेर तडीपार केले होते. सध्या म्हात्रे गोव्यात असून, अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाझरी रिसॉर्टमध्ये त्यांचा मुक्काम असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती.

Kalyan hospital doctor Yogendra Jaiswal assault case
Doctor Assault Case : डॉक्टर मारहाण प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टाचा दणका; थेट पोलिस कोठडी रवानगी

अद्याप या प्रकरणाची चर्चा थंड झालेली नसतानाच कल्याण पूर्वेतील नामांकित भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना रुग्णासोबत आलेला त्यांचा मुलगा विनीत देशमुख याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. तर या मारहाणीचे व्हिडिओ समोर आले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भानु ज्योत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर योगेंद्र जयस्वाल हे आपल्या केबिनमध्ये एका रुग्णाला आजाराबाबत सांगत होते. यावेळी तेथे रुग्णासोबत त्यांचा मुलगा विनीत देशमुख होता. यावेळी मुलगा विनीत देशमुख संतापला. यावरून रुग्णाने स्वतः आपल्या मुलाला केबिनच्या बाहेर जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो केबिनच्या बाहेर गेला.

मात्र काही वेळाने तो पुन्हा डॉक्टरांच्या केबिनमध्ये आला आणि डॉक्टर योगेंद्र जयस्वाल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे रुग्णालयातील वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Kalyan hospital doctor Yogendra Jaiswal assault case
Doctor Assault Case : डॉक्टर मारहाण प्रकरणात अटक होताच नगरसेवक म्हात्रेंची प्रकृती खालावली, थेट ICU मध्ये दाखल

दरम्यान, डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांना सेवा द्यायची कशी आणि रुग्णालये सुरक्षितपणे चालवायची कशी, असा प्रश्न डॉक्टरांकडून उपस्थित केला जात आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com