Panchayat Samiti elections : कणकवली सभापतीपदावर नांदगाव आणि नाटळ गणातील महिलांचा हक्क, देवगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण काहीच दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. त्यानंतर आज पंचायत समितीच्या गणांसाठीचे देखील आरक्षण काढण्यात आले आहे.
Maharashtra local body elections
Maharashtra local body electionsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कणकवली सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असून नांदगाव आणि नाटळ गणातील महिला दावेदार ठरल्या आहेत.

  2. देवगडमध्ये मात्र यावेळी नव्या चेहऱ्यांना निवडणुकीत संधी मिळणार आहे.

  3. या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यांतील राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.

कणकवली/ देवगड : राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतींच्या आरक्षणानंतर आज (ता.13) जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांसाठीचे देखील आरक्षण काढण्यात आले आहे. यामुळे आता प्रत्यक्षात मोर्चे बांधणीला सुरूवात होणार आहे. तर कणकवली जाहीर झालेल्या आरक्षणात महिलांना संधी उपलब्ध झाली आहे. तर देवगडमध्ये देवगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तसेच या आरक्षणावर येत्या शुक्रवार (ता.17) पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत.

महिला उमेदवार दावेदार

कणकवली तालुका पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. जे अडीच वर्षांसाठी असेल. तर नांदगाव आणि नाटळ पंचायत समिती गणातील महिला उमेदवार सभापती पदासाठी प्रमुख दावेदार असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर प्रत्येक राजकीय पक्षाचे लक्ष राहणार असून निवडणुकीच्या आधीच येथे चुरस पाहायला मिळेल.

कणकवली पंचायत समितीच्या 16 गणांसाठी आज येथील आरक्षण सोडत निघाली. सर्वाधिक 1016 अनुसूचित जातीची लोकसंख्या असलेल्या जानवली हा मतदारसंघ राखीव झाला. येथे अनुसूचित जातीतील महिला आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कलमठ, कासार्डे, नांदगाव आणि नाटळ हे मतदार संघ निश्चित झाले. तर यामध्ये नांदगाव आणि नाटळ या दोन गणांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला राखीव आरक्षण पडले. सर्वसाधारण गटासाठी शिल्लक राहिलेल्या मतदारसंघातून एकूण पाच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला राखीव आरक्षण निश्चित केले. यामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षणात बिडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओसरगाव आणि नरडवे हे गण निश्चित झाले. त्यामुळे उर्वरित सर्वसाधारणसाठी तळेरे, खारेपाटण, फोंडाघाट, हरकुळ खुर्द, वरवडे, कळसुली हे मतदारसंघ निश्चित झाले.

Maharashtra local body elections
Kokan Politics : तळकोकणात ठाकरेंना धक्का, आठ गावातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

अनेक इच्छुकांचा हिरमोड

सभापतीपदासाठीचे आणि गणातील आरक्षण हे महिलांसाठी निश्चित झाल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला आहे. जानवली मतदारसंघ मागच्या वेळेस महिलांसाठी राखीव होता. आता पुन्हा येथे अनुसुचित जातीतील महिला आरक्षण निश्चित झाले. बिडवाडी गणासाठी महिला आरक्षण निश्चित झाले. सातत्याने अशा पद्धतीने आरक्षण निश्चित होत असल्याने ओटवचे माजी सरपंच हेमंत परूळेकर यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली.

असे असेल आरक्षण

अनुसुचित जाती महिला - जानवली

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - नांदगाव, नाटळ

नागरिकांचा मागास प्रवर्ग - कासार्डे, कलमठ

सर्वसाधारण महिला - बिडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओसरगाव, नरडवे

सर्वसाधारण - तळेऱे, खारेपाटण, फोंडाघाट, हरकुळ खुर्द, वरवडे, कळसुली

देवगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी, इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आज येथे काढलेल्या आरक्षण सोडतीमध्ये काही इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी पडले आहे. यामुळे त्यांच्यावर आपले मतदारसंघ सोडण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. तर काही इच्छुकांना या आरक्षणामुळे संधी निर्माण झाली आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील एकूण 8 जिल्हा परिषद व 16 पंचायत समिती मतदारसंघांचे आरक्षण काढण्यात येणार होते. मात्र देवगड-जामसंडे नगरपंचायत झाल्याने देवगड गट व त्यामध्ये येणारे देवगड व जामसंडे असे दोन गण कमी झाले आहे. यामुळे आता 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती (गण) मतदारसंघासाठी आरक्षण सोडत झाली.

आरक्षणामध्ये शिरगाव गटातील तळवडे मतदारसंघ अनुसुचित जाती महिला आरक्षित झाला असून पुरळ व कोटकामते मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) यासाठी राखीव झाला आहे. पोंभुर्ले मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि शिरगाव, किंजवडे, बापर्डे, फणसगाव हे चार मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहेत. यामुळे अनेकांची दांडी गुल झाली आहे. तसेच कुणकेश्‍वर, पडेल, मणचे, तिर्लोट, मुणगे व नाडण मतदारसंघ अनारक्षित (सर्वसाधारण) राहिल्याने काहींना नव्याने संधी उपलब्ध झाली आहे.

निराशा आणि संधी

पुरळ, कोटकामते, फणसगाव, किंजवडे, बापर्डे, शिरगाव तसेच तळवडे मतदारसंघ महिला राखीव झाल्याने अनेकांची दांडी गुल झाली आहे. इच्छुकांची यामुळे मोठी निराशा झाली, तर कुणकेश्‍वर, पडेल, मणचे, तिर्लोट, मुणगे, नाडण मतदारसंघ अनारक्षित (सर्वसाधारण) राहिल्याने इच्छुकांना संधी आहे.

असे आहे आरक्षण

अनुसूचित जाती महिला : तळवडे

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला : पुरळ, कोटकामते

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग : पोंभुर्ले

सर्वसाधारण महिला : फणसगाव, किंजवडे, बापर्डे, शिरगाव

सर्वसाधारण : कुणकेश्वर, पडेल, मणचे, तिर्लोट, मुणगे, नाडण

Maharashtra local body elections
BJP Politics in Kokan : कोकणात राजकीय भूकंप! राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का?, शिवसेनेचा युवा नेता महायुतीच्या वाटेवर

FAQs :

प्र.१: कणकवली सभापती पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे?
👉 नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

प्र.२: कोणत्या गणातील महिला या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत?
👉 नांदगाव आणि नाटळ गणातील महिला दावेदार आहेत.

प्र.३: देवगड तालुक्यात काय बदल दिसून येत आहेत?
👉 यावेळी देवगडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळत आहे.

प्र.४: या आरक्षणाचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 महिला नेतृत्व वाढणार असून राजकीय समीकरणात बदल दिसू शकतात.

प्र.५: निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे?
👉 विविध पक्षांकडून स्थानिक स्तरावर बैठक आणि रणनीती आखली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com