Shekap-Shiv Sena alliance : स्थानिकच्या आधीच कोकणात राजकीय भूकंप, शेकाप शिवसेनेची साथ सोडणार?

Jayant Patil’s Shekap-Shivsena alliance : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आल्या असून नगराध्यक्षासह आता वॉर्डचेही आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Shekap Jayant Patil And Eknath Shinde
Shekap Jayant Patil And Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खालापूर नगर पंचायतीत स्थानिक निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे.

  2. जयंत पाटील यांचे विश्वासू संतोष जंगम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  3. या घडामोडीमुळे खालापूरमधील शेकाप-शिवसेना युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Raigad News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नुकताच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यापाठोपाठ आता नगराध्यक्षाचेही आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला असून खालापुरात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. येथे गेली अडीच वर्षे एकत्र असलेले शेकाप, शिंदे गट काडीमोड घेण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. यामुळे स्थानिकच्या आधीच राजकीय वातावरण अधिक तापणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. प्रभाग रचनेसह नगराध्यक्षाच्या आरक्षणाही जाहीर झाले आहे. अशातच खालापूर नगर पंचायत निवडणुकीसाठी दीड वर्षांचा अवधी शिल्ल्क असतानाही येछे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे सत्तेत असणाऱ्या शेकाप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटण्याची शक्यता आहे.

खालापूर तालुक्यात खोपोली नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या चार तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी निवडणुका होत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार असून महाविकास आघाडी विरोधात बसली आहे. तर खालापूर नगर पंचायतीच्या कारभारात मात्र महायुती आणि महाविकास आघडीतील दोन पक्ष एकत्र कारभार हाकताना दिसत आहेत.

Shekap Jayant Patil And Eknath Shinde
BJP Politics in Kokan : कोकणात राजकीय भूकंप! राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का?, शिवसेनेचा युवा नेता महायुतीच्या वाटेवर

येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असणारा शेतकरी कामगार पक्ष सत्तेत आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष असून शेतकरी कामगार पक्षाचा उपनगराध्यक्ष आहे. पण आता शिवसेनेसह भाजपकडून तालुक्यात शेकापची कोंडील केली जात आहे. यामुळेच खालापूर नगर पंचायतीत शेकाप उपनगराध्यक्षपदाचा त्याग करण्याच्या तयारीत आहे.

नगर पंचायतीत राजकीय बलाबल

खालापूर नगर पंचायतीत शिवसेनेचे आठ, शेकापचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक असे संख्याबळ आहे. तर शेकापचे जयंत पाटील यांचे विश्वासू संतोष जंगम लवकरच शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार आहेत.

खालापुरातील युती अडचणीत येणार

सध्या खालापूर नगर पंचायत विरोधक नसलेली एकमेव नगर पंचायत म्हणून राज्यभर परिचीत आहे. पण येथे सर्व सत्ताधारी असतानाही शहरवासियांच्या संबंधीत महत्वाचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. यामुळेच आता शेकापने आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबरच राहण्याचा निर्धार केला आहे. यामुळे खालापुरातील युती अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Shekap Jayant Patil And Eknath Shinde
Kokan Politics : 'हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी' : आरोपांनी घेरलेल्या योगेश कदमांच्या डोक्यावर 'गॉडफादरचा' हात

FAQs :

प्र.1: संतोष जंगम कोण आहेत?
👉 ते शेकाप नेते जयंत पाटील यांचे निष्ठावंत आणि खालापूर नगर पंचायतीतील प्रभावी राजकारणी आहेत.

प्र.2: संतोष जंगम कोणता पक्ष सोडणार आहेत?
👉 ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडणार आहेत.

प्र.3: या निर्णयाचा परिणाम काय होईल?
👉 खालापूरमधील शेकाप-शिवसेना युती तुटू शकते आणि नवीन राजकीय समीकरणे तयार होतील.

प्र.4: ही उलथापालथ कधी होणार आहे?
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ही उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

प्र.5: जयंत पाटील आणि शिंदे गटातील संबंधांवर या घटनेचा काय परिणाम होईल?
👉 या हालचालीमुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढू शकतो आणि युतीतील मतभेद अधिक उघड होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com