Kokan News : शिवाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ कामातही करोडोंचा भ्रष्टाचार? स्ट्रक्चरल ऑडीटची मागणी!

Parashuram Uparkar : निकृष्ट कामामुळे निरोधक संतप्त..
Parashuram Uparkar
Parashuram Uparkar Sarkarnama
Published on
Updated on

संजय परब -

Kokan Political News : मालवणमधील ४ डिसेंबरचा नौदल दिनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झाले. मात्र या जंगी कार्यक्रमाची दुसरी बाजूही समोर आल्याचे चित्र आहे. सर्जेकोट किल्ल्यावरील काही डागडुजीची कामे, पुतळ्याची साफसफाई, चौथऱ्याचे काही कामे इत्यादीच कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे चित्र आहे. यामध्ये आर्थिक हेरफार झाल्याच्या मुद्दा उपस्थित करून, या कामासंबंधीची ऑडिटची मागणी करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

मालवण परिसरात ४ डिसेंबरच्या नौदल दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याने वेधून घेतले होते. नौदलाचा कार्यक्रम सुध्दा चित्तथरारक ठरला. पण, या निमित्ताने शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा, तटबंदी, चौथरा अशा सर्व कामात हलगर्जीपणा केल्याचे बोलले जात आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा पाऊण कोटींचा असून तो दोन महिन्यात तयार करण्यात आला आहे. ब्राँझचे तुकडे एकत्र करून बांधण्यात आलेल्या या पुतळ्यावर सफाईचे हात फिरले नसल्याने तो पुतळा योग्य पद्धतीने बनला नसल्याचे दिसत आहे, असे विरोधकांकडून बोलले जात आहे.

Parashuram Uparkar
Kolhapur Politics : पालिकेची परवानगी नाही, पण धूमधडक्यात होणार स्मारकाचे लोकार्पण; कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा!

पुतळा तयार करण्याचे काम किमान सहा महिन्यांचे होते, पण दोन महिन्यात ते कसेबसे केल्याने त्याच्यातील त्रुटी आता उघड झाल्या आहेत. मालवणवासीयच नव्हे तर मालवण परिसरात बाहेरून मोठ्या संख्येने येणारे पर्यटक सुद्धा हा पुतळा पाहून नाराजी व्यक्त करत आहेत. पुतळा उभारला जात असताना संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना तो अन्य शिल्पकारांकडून तपासून घेता आला असता. पण, सरकारी कामकाजाचा नेहमीचा हलगर्जीपणा एका चांगल्या होऊ शकणाऱ्या कामाच्या मुळाशी आला आहे, असे आरोप होत आहेत.

हा पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या सर्जेकोट किल्ल्याभोवती उभारलेल्या तटबंदीचे दुरावस्था झाली आहे. तर, पुतळा चौथऱ्यावरील लाद्या निसटलेले आहेत. शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेला मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला चार शतकांचा काळ उलटल्यानंतर सुद्धा अजस्त्र लाटांना निडर छातीने सामोरे जात आज सुद्धा ताठ मानेने उभा आहे. हे काम म्हणजे महाराज आणि त्यांच्या सैनिकांच्या अजोड निष्ठेचा वस्तुपाठ आहे. तर दुसऱ्या बाजूला आताचे दोन महिन्यात कोसळलेले राजकोटचे काम हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भ्रष्टाचाराचा नमूना आहे.

नौदल दिन कार्यक्रम साजरा करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी जाहीर झाला असताना त्यासाठी वेगाने आणि सफाईने कामे करण्याची गरज होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला येणार असल्याने कामे वेळेत चांगल्या पद्धतीने उभारण्याची गरज होती. पण कोणत्याही निविदा न काढता करोडो रुपयांची कामे करण्यात आली. कामे झाल्यावर निविदा काढण्यात आल्या.

अशा बेजबाबदारपणामुळे आता त्यातील फोलपणा उघड झाला आहे. मालवणच्या बोर्डिंग मैदानावर उभारलेली तीन हेलिपॅड कार्यकमाच्या दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबरला उखडण्यात आली. यामुळे यावर खर्च झालेला तीन एक कोटींचा खर्च पाण्यात गेला आहे. याशिवाय मैदान परिसराची अवस्था भयंकर झाली असून ते मुलांना खेळण्याच्या, लोकांना फिरण्याच्या लायकीचे राहिलेले नाही.

Parashuram Uparkar
Maratha Reservation : आरक्षण मिळेना, मराठ्यांच्या मुलांची लग्नं होईना; राष्ट्रवादीच्या आमदाराने 'असा' जोडला संबंध!

या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे. तर, या एकूण कामाची सखोल चौकशी करण्यासाठी माहिती अधिकाराखाली माहिती मागवण्यात आली असून याबाबत लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे मनसे नेते परशुराम उपरकर यांनी जाहीर केले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com