Kolhapur Politics : पालिकेची परवानगी नाही, पण धूमधडक्यात होणार स्मारकाचे लोकार्पण; कोल्हापूरचा पॅटर्नच वेगळा!

Kolhapur Political News : स्वत: कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार असल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी
Kolhapur Politics
Kolhapur Politics Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : मागील अनेक वर्षापासून कोल्हापूर शहरातल्या पापाची तिकटी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकावरून राजकीय वाद सुरू आहे. अनेक आंदोलनं झाल्यानंतर स्मारकाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. आज सायंकाळी या स्मारकाचे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मात्र या लोकार्पण सोहळ्यासाठी महापालिकेने परवानगीच दिली नाही. पण या सोहळ्यासाठी स्वत: कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार असल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Politics
NCP Crisis: मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष काकाचा की पुतण्याचा ? लेखी सबमिशन सादर करण्याचा शेवटचा दिवस

महापालिकेतर्फे आज होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली नाही. काम अजूनही अपूर्ण असल्याने लोकार्पण शक्य नाही, असे लेखी पत्र महापालिका प्रशासनाने दिले आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल तरुणांना आतुरता लागली आहे. आज सायंकाळी चार वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या लोकार्पणाचा सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, विषय संवेदनशील असल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याने आयोजकांना नोटीस पाठवल्या आहेत. मार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून अजून काम शिल्लक असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे. पापाची तिकटी येथील दोन्ही रस्ते एकेरी मार्गाचे आहेत. या रस्त्यावर दिवसाप्रचंड वाहतूक असल्याने रात्री क्रेनने म्युरल बसवले. मात्र काम अपूर्ण असल्याने महापालिकेतर्फे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले नाही.

Kolhapur Politics
Vivek Kamble Pass Away : माजी महापौर 'पँथर' विवेक कांबळे यांचे निधन!

स्मारक समितीने एकत्र येऊन आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी पापाची तिकटी परिसराला विद्युत रोषणाईने सजवले आहे. ढोल ताशा पथक, विद्युत रोषणाई शो विविध कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले आहे. त्यामुळे प्रशासनाची ही कोंडी झाली आहे. आयोजकांनी जवळपास लोकार्पणाचे 90% काम पूर्ण केले असून सायंकाळी चार वाजता त्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली तयारी महापालिका प्रशासनाला आत्ताच का दिसली? हा देखील सवाल उपस्थित झाला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com