Toll Mafi : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, सरकारकडून टोलमाफी; कुठे मिळणार पास?

Toll Free For Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना महायुती सरकारने गुड न्यूज दिली असून, टोलमाफीची घोषणा केली आहे. यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Toll Free
Toll FreeSarkarnama
Published on
Updated on

Kokan Ganeshotsav News : कोकणात गणेशोत्सव साजरा करायला जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी असून, महायुती सरकारने टोलमाफीची घोषणा केली आहे. तसेच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनासह एसटी महामंडळाकडून देखील जादा आणि विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई-सावंतवाडी दरम्यान दैनिक एक्सप्रेस सुरू करण्यात आली असून, मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जाण्यासाठी जादाच्या ५,२२० जादा एसटी सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला असताना बाप्पाच्या आगमनाची राज्यभरात जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या आहे. प्रवाशांची मोठी संख्या पाहता राज्य सरकारने उपाययोजनांकडे लक्ष केंद्रित केले आहे.

Toll Free
DJ Ban Ganeshotsav: राज्यात कोणत्या जिल्ह्यात डीजेला परवानगी? कुठे बंदी? प्रशासनाची भूमिका काय? वाचा सविस्तर

शासन परिपत्रक जारी

सरकारने यावर्षी देखील कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी जाहीर केली आहे. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही टोलमाफी मिळणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन परिपत्रक जारी केले आहे.

अटल सेतू मार्ग

मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या टोल नाक्यांवर ही टोलमाफी मिळणार आहे. त्याचबरोबर नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतू मार्गावरील टोल नाक्यावर देखील टोलमाफीचा लाभ दिला जाणार आहे.

स्वतंत्र स्टिकर किंवा पास

कोकणात गणेशोत्सव साजरा करायला जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ मिळावा यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यावर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव असेल. तर हे पास परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दिले जाणार आहे.

बसलाही मिळणार पास

गणेशोत्सवासाठी विविध जिल्ह्यांतून कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफीचा पास दिला जाणार आहे. हे पास पोलीस किंवा प्रादेशिक परिवहन विभागामार्फत दिले जाणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या भक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी होणार असून, चाकरमान्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Toll Free
Ganeshotsav News : गणेशोत्सवाच्या तोंडावर कंत्राटदारांसह चाकरमान्यांसाठी खुशखबर! रखडलेल्या कामांच्या बिलांचा मार्ग मोकळा; रस्त्यांचीही होणार दुरुस्ती

विशेष रेल्वेची घोषणा

दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने मडगाव-LTT विशेष ट्रेन आणि चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमूची घोषणा केली आहे. कोकणात गावी जाताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. ही रेल्वे सेवा १५ आणि १८ सप्टेंबर रोजी मडगाववरून कोकणात जाण्यासाठी, तर परत येताना १६ आणि १९ सप्टेंबर रोजी असेल. तर चिपळूण ते पनवेलदरम्यान अनारक्षित मेमू लोकल १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर दरम्यान धावणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com