BJP Vs Shivsena : 'नाही तर मी हिंदू नाही, असं काही म्हणाले असते' भगव्या शालीवरून शिंदेंच्या शिलेदाराचे नितेश राणेंना सडेतोड उत्तर

Uday Samant On Nitesh Rane Over Saffron shawl controversy : भगव्या शालीवरून पुन्हा एकदा तळ कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच गरम होताना दिसत आहे. महायुतीचे दोन मंत्र्यांमध्ये सध्या वाद चांगलाच वाढल्याचेही यावेळी दिसत आहे.
Nitesh Rane And Uday Samant over shawl controversy
Nitesh Rane And Uday Samant over shawl controversysarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. तळ कोकणात भगव्या शालीवरून राजकीय वातावरण तापलं आहे

  2. शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये यावरून वाद उफाळळा आहे

  3. मंत्री नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात यावरून चांगलीच जुंपली आहे

Ratnagiri News : भगव्या शालीवरून तळ कोकणातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. येथे भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्यात चांगलीच जुंपली आहे. काही दिवसांपूर्वीच रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा, असा टोला निलेश राणेंनी उदय सामंत यांना लगावला होता. ज्यानंतर काही जण भगव्या शाली घालून मिरवतात, असे म्हणत उदय सामंतांनी राणेंना उत्तर दिलं होतं. त्यावरून हा वाद आणखीच वाढला होता. आताही या वादात भर पडली असून पुन्हा एकदा सामंत-राणे आमने-सामने आले आहेत.

तळ कोकणात सध्या भाजप नेते तथा मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे आणि शिवसेना नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात वर्चस्व वादाची लढाई होताना दिसत आहे. नुकताच एका प्रवेशामुळे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर त्यांच्यात भगव्या शालीवरून वाद सुरू झाला तो अद्याप काही थांबलेला नाही. दोघांत रंगलेला कलगीतुरा सुरुच आहे.

रत्नागिरीतील लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरावा असा सल्ला काहीच दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी दिला होता. तसेच त्यांनी, रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा, असे म्हटले होते. त्यांचा रोख उदय सामंत यांच्याकडे होता. तसेच त्यांनी, कोणाकडे भगवा मफलर अथवा शाल नसेल तर माझ्या गाडीत स्टॉक असल्याचे सांगत सामंत यांना डिवचले होते.

Nitesh Rane And Uday Samant over shawl controversy
BJP Vs Shivsena UBT Politics: प्राणघातक हल्ल्यातील युवक चिंताजनक, भाजप नेते उद्धव निमसे यांची अटक पूर्व जामीनासाठी धाव!

यावरून आता सामंत यांनीही प्रत्युत्तर दिले असून जोरदार टोला लगावला आहे. सामंत यांनी भगवी शाल दिली ते बरं झालं, मी भगवी शाल तशीच ठेवली आहे. भगवी शाल काढली असती तर मी हिंदू नाही असं काही म्हणाले असते, असे म्हटलं आहे. त्यांनी दिलेल्या प्रत्युत्तराची सध्या राज्यभर चर्चा होत आहे.

याबरोबरच सामंत यांनी, रत्नागिरीमध्ये काय करावे लागते ते आपल्यालाच माहित आहे. याची कल्पना दुसऱ्यांना नाही. ज्याचे जळते त्यालाच कळते, सेवाभावी संस्थेमध्यून मी मोठा झालो असल्याचेही टोला उदय सामंत यांनी राणेंना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?

नितेश राणे यांनी सामंत यांचा चिमटा काढत टोला लगावला होता. सध्या रत्नागिरीत काही मफलर वाले फिरत आहेत. पण रत्नागिरीतील लोकांनी भगवे मफलर वापरावेत, असा टोला लगावला होता. वाटद खंडाळा औद्योगिक वसाहतीवरुन सुरु असलेल्या वादावरून त्यांनी जोरदार टीका केली होता. त्यावेळी त्यांनी, तळ कोकणात रोजगार आला पाहिजे. रिफायनरी आणि वाटद सारख्या औद्योगिक वसाहत झाल्या पाहिजेत. मग कुणीही प्रकल्प आणला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे, असे म्हणत सामंत यांच्यावर तोफ डागली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com