Nilesh Rane: फक्त 20 तारखेपर्यंत सहन करा, नंतर कधीच..! निलेश राणेंची हात जोडून विनंती

Kudal Assembly Constituency: कुडाळ विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्ये लढत होणार आहे.
Nilesh Rane, Vaibhav Naik
Nilesh Rane, Vaibhav NaikSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : कोकणातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात ही लढत होणार आहे. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

निलेश राणे यांनी कुडाळमधून उमेदवारीसाठी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या उमेदवारीमुळे वैभव नाईक यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. या प्रवेशानंतर निलेश यांनी शुक्रवारी ‘एक्स’वर एक पोस्ट करत नाईकांवर गंभीर आरोप केले आहेत.

Nilesh Rane, Vaibhav Naik
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News : ओबीसी उमेदवारांसाठी राहुल गांधी आग्रही

मी कुडाळ मालवण वासियांना हात जोडून विनंती करतो, असे म्हणत राणेंनी आवाहन केले आहे की, मला खात्री आहे, आमदार नाईकांनी आपल्याला फोन करून त्रास द्यायला सुरु केला आहे. पण आपण फक्त 20 नोव्हेंबरपर्यंत सहन करा, नंतर कधीच आपल्याला कसलाही त्रास मी होऊ देणार नाही.

व्यावसायिकांना, अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या घटकांना फोन करून मला भेटून जा, नाहीतर मी बघून घेईन, हे सध्या उपक्रम नाईक यांचे सुरु असल्याचे गंभीर आरोप राणेंनी केला आहे. कारखाने बंद करून टाकेन अशी धमकी दिली जात आहे, जो सहकार्य करणार नाही त्याला संपून टाकायच्या धमक्या दिल्या जात आहेत, असा दावा राणेंनी पोस्टमध्ये केला आहे. म्हणून मी अगोदर म्हणालो, फक्त 20 तारखे पर्यंत सहन करा, असे राणेंनी शेवटी म्हटले आहे.

Nilesh Rane, Vaibhav Naik
Pune Politics: महायुती-आघाडीची डोकेदुखी वाढणार; 'या' मतदारसंघात दोन राष्ट्रवादी अन् दोन शिवसेनेमध्येच लढत रंगणार?

वैभव नाईक हे राणेंचे कट्टर विरोधक मानले जातात. ते सातत्याने खासदार नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर टीकेची झोड उठवत असतात. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नाईक यांनी थेट राणेंना आव्हान दिले होते. त्यामुळे नाईक यांच्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट राणेंच्या कुटुंबातील सदस्यालाच रिंगणात उतवण्यात आल्याने ही लढत हायहोल्टेज ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com