Uddhav Thackeray News : कोकणात भाजपचा ठाकरेंना दणका, नगरपंचायतीत पराभव; एका नगरसेवकानं केला गेम

Kudal Nagar Panchayat Election Shiv Sena BJP Prajakta Bandekar : नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. आघाडीकडे 17 पैकी 9 नगरसेवक होते. तर विरोधकांकडे आठ नगरसेवक होते.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kokan News : विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर आता उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कुडाळ विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांना पराभव पत्करावा लागला होता. आज कुडाळ नगरपंचायतही ठाकरेंच्या हातून निसटली. बहुमत असूनही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारावर पराभवाची नामुष्की ओढवली.

नगरपंचायतीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. आघाडीकडे 17 पैकी 9 नगरसेवक होते. तर विरोधकांकडे आठ नगरसेवक होते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका नगरसेविकेने भाजप उमेदवार प्राजक्ता बांदेकर यांच्या पारड्यात आपले मत टाकल्याने त्यांचा विजय झाला. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सई काळप यांचा केवळ एका पराभव झाला. 

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Waqf Bill JPC News : अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित; ‘वक्फ’च्या बैठकीत सत्ताधारी-विरोधक भिडले

कुडाळ नगरपंचायतीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसची सत्ता होती. नगराध्यक्ष पदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरला होता. त्यानुसार पहिली अडीच वर्षे काँग्रेसच्या अक्षता खटावकर नगराध्यक्ष होत्या. फॉर्म्यूल्यानंतर त्यांनी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती.

नगराध्यक्षपदासाठी सोमवारी आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या नगरसेविका सई काळप यांनी तर महायुतीकडून प्राजक्ता बांदेकर यांनी सोमवारी (ता. 20) उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी निवडणूक झाली. आघाडी आणि युतीमध्ये केवळ एका मताचा फरक असल्याने दोन्ही बाजूच्या नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत करावी लागली.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis government : शिंदेंनी सीमाभागासाठी सुरु केलेल्या योजनांचा लाभ फडणवीस सरकारच्या काळात बंद ?, माजी आमदाराचा गंभीर आरोप

शिवसेना नेते निलेश राणे हे कुडाळचे आमदार आहेत. बांदेकर यांच्या विजयासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आघाडीच्या एक नगरसेविका निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल होत्या. त्यामुळे आघाडीची धाकधूक वाढली होती. अखेर या नगरसेविकेनेच युतीच्या पारड्यात आपले मत टाकल्याने बांदेकरांचा विजय झाल्याचे स्पष्ट झाले. तर वैभव नाईक यांच्या राजकीय अस्तित्वाला पुन्हा एका कुडाळमध्ये धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com