भास्कर जाधव चिपळूण-गुहागरमधून निवडून कसे येतात?, तेच आता बघू : दरेकरांचे चॅलेंज

भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमधून येऊन शिवसेनेच्या निष्ठेच्या गोष्टी शिकवू लागले आहेत.
Bhaskar Jadhav-Pravin Darekar
Bhaskar Jadhav-Pravin DarekarSarkarnama
Published on
Updated on

कुडाळ : दिवा विझताना ज्या पद्धतीने फडफडतो, त्याच पद्धतीने आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची शेवटची फडफड सुरू आहे. चिपळूणच्या भास्कर जाधवांची ज्योत भारतीय जनता पक्ष विझवून टाकल्याशिवाय राहणार नाही. चिपळूण-गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात, हे आम्ही बघून घेऊ, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आमदार जाधव यांना दिला. (Let's see how Bhaskar Jadhav gets elected from Chiplun-Guhagar : Darekar)

आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या वतीने संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आमदार दरेकर बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार नीतेश राणे, नीलेश राणे आदींसह भाजपचे नेते उपस्थित होते.

Bhaskar Jadhav-Pravin Darekar
MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

आमदार दरेकर म्हणाले की, आमदार वैभव नाईक यांना सपोर्ट करायला चिपळूणमधून सोंगाड्या आले होते. हे भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमधून येऊन शिवसेनेच्या निष्ठेच्या गोष्टी शिकवू लागले आहेत. त्यांनी पवारांचा आणि राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्याचा जाधवांना विसर पडला आहे, त्यामुळे ते आता ठाकरेसाहेब, उद्धव ठाकरे गट याबाबत येऊन लोकांना सांगत आहेत.

Bhaskar Jadhav-Pravin Darekar
अनिल देशमुखांची दिवाळी घरी की कोठडीत? उद्या होणार निर्णय...

दिवा विझताना जसा फडफडतो. तशीच भास्कर जाधव यांची शेवटची फडफड सुरू आहे. चिपळूणच्या भास्कर जाधवांची ज्योत भारतीय जनता पक्ष विझवून टाकल्याशिवाय राहणार नाही. चिपळूण-गुहागरमधून भास्कर जाधव कसे निवडून येतात, हेच आता भाजप बघून घेईल. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करणार. भाजप आणि कोकणची जतना हे कदापि माफ करणार नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांची राजकीय ज्योत विझवून टाकण्याचे काम भारतीय जनता पक्ष निश्चितपणे करेल, असे आव्हानही दरेकरी यांनी जाधवांना दिले.

Bhaskar Jadhav-Pravin Darekar
दौंडकरांसाठी मोठी बातमी : तीन हंगामानंतर भीमा-पाटस कारखाना सुरू होणार!

भास्कर जाधव हे महत्वाचे नाहीत तर त्यांच्यासारखी प्रवृत्ती वाढणे धोक्याचे आहे. कुडाळमध्ये येऊन ते येथील वातावरण बिघडवणार असतील, नको ते अंगविक्षेप करून आमच्या नेतृत्वावर टीका करणार असतील तर आम्ही त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या नेतृत्वावर टीका करणार असाल तर आम्हीही जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com