अनिल देशमुखांची दिवाळी घरी की कोठडीत? उद्या होणार निर्णय...

ईडीच्या प्रकरणात देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र अद्याप सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला नसल्यामुळे त्यांचा मुक्काम कारागृहात आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

मुंबई : कथित शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणात अटकेत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून, शुक्रवारी यावर विशेष न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशमुख यांची दिवाळी कोठडीत जाणार, की नाही याचा निर्णय उद्या (शुक्रवार) होण्याची शक्यता आहे. देशमुख मागील वर्षी नोव्हेंबरपासून अटकेत आहेत. त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. (Anil Deshmukh's Diwali at home or in custody? Decision to be made tomorrow...)

ईडीच्या प्रकरणात देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे; तर सर्वोच्च न्यायालयाने हा जामीन कायम ठेवला आहे. मात्र अद्याप सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झाला नसल्यामुळे त्यांचा मुक्काम कारागृहात आहे. त्यामुळे त्यांनी सीबीआय प्रकरणात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. विशेष न्यायालयात या अर्जाला सीबीआयने विरोध केला आहे. देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून खंडणी वसूल केली आणि याबाबत पुरेसे पुरावे आहेत, असा दावा केला आहे.

Anil Deshmukh
दौंडकरांसाठी मोठी बातमी : तीन हंगामानंतर भीमा-पाटस कारखाना सुरू होणार!

निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझे याप्रकरणी माफीचा साक्षीदार आहे. तसेच देशमुख यांचा मुलगा सलील यांना याची माहिती होती. तसेच वाझे आणि आरोपी संजय पाटील यांचे मोबाईल संभाषण सीबीआयकडे आहे, असा दावा अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी केला आहे.

Anil Deshmukh
'केंद्रीय मंत्री दानवेंच्या घराला अभय; गरीब कुंभाराचे घर मात्र रात्रीत पाडले'

देशमुख यांनी या दाव्याचे खंडन केले आहे. माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही, असा बचाव त्यांनी केला आहे. देशमुख सध्या हृदयविकाराने त्रस्त आहेत. विशेष न्या. एस. एच. गवलानी यांनी गुरुवारी यावर सुनावणी पूर्ण केली. तसेच उद्या (शुक्रवार) शक्य असल्यास निकाल देईन, असेही स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com