Anant Geete : तटकरेंना मिळालेली मतं जाधवांची होती, आता तेच सोबत...! गीतेंनी रणशिंग फुंकले

Sunil Tatkare : सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत.
Anant Geete, Sunil Tatkare
Anant Geete, Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : कोकणात रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार अनंत गीते यांनी रणशिंग फुकले आहे. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात रायगडमधून गीतेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्याच विश्वासाने त्यांनी काही दिवसांपासून तयारी सुरू केली असून तटकरेंचा पराभव होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.

रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा अशा एकूण नऊ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी दिली असून या वेळेला आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास गीतेंनी व्यक्त केला. माझं घर फोडणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांना आपण या वेळेला गाडायचे आहे, असा निर्धार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे.

Anant Geete, Sunil Tatkare
Solapur: दिव्यांग महिलेनं मागितलं होतं घर अन् साकारला 30000 घरांचा प्रकल्प...!

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गीते यांनी रायगड लोकसभा कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील लोटेमाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मागच्या लोकसभेत तटकरेंना जी मते मिळाली ती तटकरेंची नव्हती, तर आमदार भास्कर जाधव यांची होती. या वेळेला भास्कर जाधवच माझ्यासोबत आहेत, त्यामुळे सगळ्यात जास्त मताधिक्य मिळवून मी खासदार होणार असल्याचे गीते यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गद्दारांसाठी गडावरचे दोर कापलेले आहेत त्यांना पुन्हा पक्षात थारा नाही, असे सांगत 40 गद्दार गेलेत, पण आम्ही 140 निवडून आणू, असाही विश्वास गीतेंनी कार्यकर्त्यांना दिला. सत्तर वर्षे काँग्रेसची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती. पण तरीही त्या काँग्रेसने एवढे गलिच्छ राजकारण केले नव्हते तेवढे गलिच्छ आणि नीच राजकारण भाजपाने केले आहे. महाराष्ट्रातील जनतेने असले राजकारण केव्हाही पाहिले नव्हते, अशी टीका गीतेंनी भाजपवर केली. सर्वसामान्य मतदारांच्या आणि बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांच्या मनातली खदखद या निवडणुकांमध्ये उफाळून येणार आहे आणि ती खदखदच सत्तापरिवर्तन करेल, असेही गीते म्हणाले.

जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा उपप्रमुख सचिन ऊर्फ पप्पू आंब्रे, तालुकाप्रमुख अंकुश काते, सचिव संदीप कदम, उप तालुका प्रमुख विजय साळुंखे, विष्णू आंब्रे, महेश गोवळकर, घाणेखुंट सरपंच संतोष ऊर्फ राजू ठसाळे, धामणदेवी विभागप्रमुख राजेंद्र घाग, दिलीप आंब्रे, संतोष उत्तेकर, विभाग उपप्रमुख सतीश आंब्रे, जयवंत पालांडे, मोहन आंब्रे, डॉ. मच्छिंद्र गोवळकर, सचिव चेतन वारणकर, विलास कडू, दिलीप दिवेकर, उमेश महाडिक, प्रवीण काते, विष्णू आंब्रे, महेश आंब्रे, अजय चालके, गंगाराम चालके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited By - Rajanand More)

R...

Anant Geete, Sunil Tatkare
Nashik Politics : भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे 'तेरे राम... मेरे राम...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com