Nashik Politics : भाजपच्या बालेकिल्ल्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे 'तेरे राम... मेरे राम...'

Ram Geet Sandhya Ncp Sharad Pawar Organize Program In Nashik : उद्धव ठाकरेंनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भाजपची कोंडी...
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Ncp Sharad Pawar Group Program In Nashik :

भाजप अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा करणार आहे. त्याचा राजकीय दृष्टीने मोठा गाजावाजा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला प्रत्युत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात 22 तारखेला दर्शन घेणार आहे. यानंतर आता नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार गट) भाजपच्या बालेकिल्ल्यात राम गीत संध्या कार्यक्रम आयोजित करत भाजपला चोख उत्तर दिले आहे.

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भाजपने शहरात जोरदार राजकीय कॅम्पेन सुरू केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा एक यशस्वी राजकीय इव्हेंट म्हणून कार्यकर्ते त्याकडे पाहत आहेत. त्यासाठी शहरभर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या फ्लेक्सच्या माध्यमातून नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वतःचा जोरदार प्रचार करत प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना झाकोळण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( Sharad Pawar Group ) विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाट यांनी केसरी सामाजिक संस्था आणि शिव सह्याद्री सामाजिक संस्थेतर्फे अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राम गीतांचा कार्यक्रम आयोजित करून भाजपला चोख उत्तर दिले आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Dada Bhuse: नार्वेकरांवर शंका घेणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान ; भुसेंचा ठाकरेंवर पलटवार...

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेला हा कार्यक्रम भाजपच्या बालेकिल्ल्यातच ठेवला आहे. त्यात अमित हरिनामे यांचा 'मेरे राम' हा राम गीतांचा भक्तिमय कार्यक्रम करण्यात येणार आहे. या या कार्यक्रमाची टॅगलाईन 'तेरे राम... मेरे राम... सबके अपने अपने राम...' अशी ठेवण्यात आली आहे. कर्मचारी निमित्ताने दीपोत्सव आणि महाप्रसाद देखील होणार आहे. त्यामुळे भाजपकडून श्रीराम मंदिराच्या विषयावर होणारा प्रचार हायजॅक करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कसून तयारी केल्याचे चित्र आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यातच हा कार्यक्रम होत असल्याने तो देखील चर्चेचा विषय ठरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतातील सर्वच लोकांची श्रीरामावर श्रद्धा आहे. आम्ही देखील नियमितपणे त्याचे पूजन करतो. श्रीरामाच्या आदर्श प्रमाणे व्यक्तिगत जीवनात वर्तणूक करतो. मात्र त्याचा कधीही राजकीय दृष्टिकोनातून प्रचार किंवा चर्चा करीत नाही. भाजप मात्र खरोखर मंदिरात जातो की नाही श्रीरामाविषयी त्यांना किती प्रेम आणि आपुलकी आहे. हे सगळे कोणालाच ठाऊक नसताना फक्त राजकीय दृष्टिकोनातून आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून, ते श्रीराम मंदिर अपूर्ण असताना त्याची प्राणप्रतिष्ठा करत आहेत. हे अनेकांच्या मनाला व्यतीत करणारे ठरले आहे. त्या दृष्टीने आम्ही अतिशय भक्तिभावाने व कोणताही राजकीय हेतू न ठेवता श्रीराम गीतांचा कार्यक्रम ठेवला आहे, असे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष शिरसाठ म्हणाले.

या कार्यक्रमाला परिसरातील सर्वच नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या भागात सर्वच नगरसेवक भाजपचे आहेत. हा परिसर भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा कार्यकर्ते करतात राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीराम गीतांचा कार्यक्रम ठेवत त्यांना अडचणीत आणण्याचा पुरेपूर डाव रचला आहे.

edited by sachin fulpagare

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Shivsena politics : गीतेंच्या मिसळ पार्टीचा आमदार फरांदेंना ठसका? ठाकरेंचा नाशिक दौरा ठरणार महत्त्वपूर्ण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com