Raj Thackeray Speech : उद्धव ठाकरेंनी सत्तेचा बोळा..., राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Narayan Rane Rally : नरेंद्र मोदींच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्या आजही पटत नाहीत. माणसानं मोकळं असावं, असं म्हणत 2019 ला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना केलेल्या विरोधाचे समर्थन केले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले मात्र ते प्रचार सहभागी झाले नव्हेत. महायुतीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी प्रथमच सहभागी झाले. कणकवलीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे भाजप उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी आयोजित सभेत राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत कोकणाच्या विकासाचा संकल्प बोलून दाखवला.

Raj Thackeray
Devendra Fadnavis: 'दिल्ली'तून बांधली जातेय फडणवीस विरोधकांची मोट? खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा अन्...

नरेंद्र मोदींच्या Narendra Modi ज्या गोष्टी पटत नाहीत त्या आजही पटत नाहीत. माणसानं मोकळं असावं, असं म्हणत 2019 ला राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना केलेल्या विरोधाचे समर्थन केले. तर, 2014 पासून उद्धव ठाकरे साडेसात वर्ष सत्तेत होते. त्यावेळी उद्योगधंदे बाहेर का गेले,असे म्हणत उद्धव ठाकरेंच्यावर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या Raj Thackeray भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

* 2014ते 2019 या काळात नरेंद्र मोदींच्या ज्या गोष्टी नाही पटल्या त्या आजही पटत नाही.

*ज्या गोष्टी नाही पटल्या त्या गोष्टी जाहीरपणे बोलतो. आजही विरोधपक्षातील लोकं या गोष्टी जाहीरपणे बोलू शकत नाही.

*370 कलम हटवण्याच्या गोष्टी मला उमजतंय तशा ऐकत होतो. मात्र, 370 कलम हटलं ते नरेंद्र मोदी सरकारमुळे हे मान्य करावं लागलं.

*बाबरीचा ढाच्या पाडला. 92 मध्ये झालेली गोष्ट आहे ती. नरेंद्र मोदी यांचे सरकार असताना राम मंदिर बनण्याची परवानगी मिळाली. नरेंद्र मोदी आणि सुप्रीमक कोर्टामुळे राम मंदिर उभं राहिलं. कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली.

*भाजपकडून उद्धव ठाकरेंना अडीज वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मिळाले असते तर ते आत्ता जे बोलतायेत ते बोलले असता का?नसते बोलले. सत्तेचा बोळा तोंडात घातला असता.

*ती गोष्ट उद्धव ठाकरेंकडून हिरावून घेतली म्हणून त्यांच्या बुडाला आग लागली.

* कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही. यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार समर्थन करणार. वरवर पकडून नका. यामद्ये जमीनीचे व्यवहार आहेत.

*तुमच्याकडून दहा रुपयाला जमीन घ्यायची आणि प्रकल्पाच्या नावाखाली सरकारकडून दोनशे रुपये घ्यायचे.हे इथल्या लोकप्रतिनिधींचे धंदे सुरू आहेत.

*2014 पासून उद्धव ठाकरे साडेसात वर्ष सत्तेत आहेत. मग उद्योगधंदे बाहेर का गेले.

Raj Thackeray
Shantigiri Maharaj News : उमेदवारी अर्ज बाद तरीही शांतिगिरी महाराज रिंगणात, नेमकं घडलं काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com