Raj Thackeray News : 'रेल्वे इंजिन' कष्टातून मिळवलं, कोर्टानं दिलं नाही; दादा-भाईंना अप्रत्यक्ष 'ठाकरी टोला'...

Lok Sabha Election 2024 : "राजकारणासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, खासदारकीसाठी स्वाभिमान गहाण टाकायचा? हे माझ्याकडून शक्य नाही."
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रेमापोटी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. या आधी त्यांच्या ठाकरे यांच्या दिल्लीवारीची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीबाबतची अधिक चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांना सांगण्यात आले की, तुमचे उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर निवडणुकीसाठी उतरवा. मात्र यासाठी ठाकरेंनी साफ नकार दर्शवला. (Latest Marathi News)

Raj Thackeray News
Shinde Will Join BJP? : सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार?; नाना पटोलेंनी दिले हे उत्तर...

एका युट्यूब चॅनेलला राज ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. ठाकरे यांनी विचारण्यात आले की, तुम्हाला धनुष्यबाण या चिन्हावर मनसेचे उनेदवार उतरवा असं सांगण्यात आलं. यावेळी तुमची भूमिका काय होती. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "अठरा वर्षे माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) मनसैनिकांनी काम करून, कष्ट करुन रेल्वे इंजिन हे कमावलेलं चिन्हं आहे. सहज गंमत म्हणून मला चिन्हं आलेलं नाही. रेल्वे इंजिन चिन्हं मला कोर्टातून मिळालेलं नाहीये, असं म्हणत त्यांनी नाव न घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray News
Raj Thackeray news : वहिनींसाठी राज ठाकरे बारामतीच्या मैदानात !
Raj Thackeray News
Thane Lok Sabha Election : मला अटक व्हायची तेव्हा पहिला फोन राज ठाकरेंचा...; भेटीनंतर म्हस्केंनी सांगितली आठवण!

राज ठाकरे (Raj Thackeray) पुढे म्हणाले, "लोकांनी मला मतदान करून त्या आधारावर रेल्वे इंजिन ही मिळालेली गोष्ट आहे. जर माझं चिन्हं असताना मी दुसऱ्याच्या चिन्हावर निवडणुकीसाठी, खासदारकीसाठी उमेदवार उभा करायचा, हे कसं शक्य आहे?" राजकारणासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, खासदारकीसाठी स्वाभिमान गहाण टाकायचा? हे माझ्याकडून शक्य नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com