Loksabha Election 2024 : 'रायगड'मध्ये नवा ट्विस्ट; युवा सेनेकडून विकास गोगावले 'भावी खासदार'

Mahad Assembly Constituency : महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे मुख्य प्रताप असलेले भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी युवा सेनेने लोकसभा उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमधील जागावाटपाचा वाद समोर आला आहे.
Raigad
RaigadSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन सुरू असतानाच आता रायगड लोकसभेमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. रायगड लोकसभेमध्ये आता युवा सेनेने उमेदवारीची मागणी केली आहे. महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे मुख्य प्रताप असलेले भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यासाठी युवा सेनेने लोकसभा उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमधील जागावाटपाचा वाद समोर आला आहे.

रायगड लोकसभा (Raigad Loksabha) मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच लढवणार हे जवळपास निश्चित आहे. असे असताना भाजपने धैर्यशील पाटील यांच्यासाठी मागणी केली आहे व रायगड लोकसभेत भाजपचे धैर्यशील पाटील हे भावी उमेदवार असा उल्लेख भाजपकडून यापूर्वी अनेकदा उघडपणे करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी (NCP) मध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या या वादात अशातच शिवसेनेनेही यामध्ये उडी घेतली आहे.

Raigad
MNS 18th Foundation Day : पवार कुटुंबात फूट? राज ठाकरे म्हणाले, 'आतून सगळे एकच...'

आता या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमधूनही युवा सेनेचे विकास गोगावले यांना रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूरमधील युवासेना (Yuvasena) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकेच नाहीतर रायगडमध्ये भावी खासदार असा उल्लेख करणारे विकास गोगावले यांचे बॅनर झळकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमचं ठरलंय भावी खासदार विकास गोगावले अशा स्वरूपाची ही बॅनरबाजी महाड विधानसभा (Mahad Assembly) मतदारसंघात करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार असताना या लोकसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी, असा आग्रह महाड येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून धरण्यात आला आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर शिवसेनेकडून कोणती भूमिका घेतली जाते किंवा महायुतीचे नेते या सगळ्या वादावर कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Raigad
MNS 18th Foundation Day : राज ठाकरेंची पुढची पिढी मैदानात, मात्र जुने प्रश्न कायम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com