municipal election : दहा दिवस जादा मिळूनही मतदान वाढले नाही! महायुती-मविआ चिंतेत, उमेदवारांची धाकधूक वाढली

Mahayuti Vs MVA : गेल्या काही दिवसांपासून वेध लागलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रभाग क्र.१० चे आज मतदान झाले. रविवारी लगेचच मतमोजणी होणार आहे.
local elections Maharashtra
local elections MaharashtraSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. प्रभाग क्र. 10 मधील नगरसेवकपदासाठी आज 49.78 टक्के मतदान नोंदवले गेले.

  2. दहा ते पंधरा दिवसांचा जादा कालावधी मिळूनही मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली नाही.

  3. कमी मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.

Ratnagiri News : निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेल्या प्रभाग क्र. १० मधील नगरसेवकपदासाठी आज ४९.७८ टक्के मतदान झाले. या प्रभागातील चार उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतपेटीत बंद झाले. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानाएवढेच यावेळी मतदान झाले असून दहा ते पंधरा दिवसाचा जादा अवधी मिळूनही मतदानाचा टक्का वाढलेला नाही. दिवसभराचा मतदानाचा विचार केला तर नागरिकांमध्ये अपेक्षित उत्साह दिसला नाही. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसत आहे.

प्रभाग १० मध्ये एकूण ४ हजार १४४ मतदार असून त्यासाठी चार मतदान केंद्रांची निर्मित करण्यात आली होती. सकाळी साडेसात ते साडेनऊ या टप्प्यात ८.२० टक्केच मतदान झाले होते. साडेनऊ ते साडेअकरा अशा दुसऱ्या टप्प्यात १९.३५ झाले.

तर साडेअकरा ते दीडपर्यंत २९.८५ आणि दीड ते साडेतीन पर्यंत ४० टक्के मतदान झाले. यानंतर साडेपाचपर्यंत ४९.७८ टक्के मतदान झाले. या प्रभागातील मतदारांमध्ये अपेक्षित उत्साह दिसला नाही. उमेदवार आणि पदाधिकारी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र त्यांना अपेक्षित यश आले नाही.

local elections Maharashtra
Mahayuti Vs MVA : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होणार 'बिगफाईट', जिल्हा परिषदेतही उडणार धुरळा

महायुतीतील भाजपचे राजू तोडणकर आणि मानसी करमरकर, तर महाविकास आघाडीकडून राजाराम रहाटे आणि श्वेता कोरगावकर निवडणूक आखाड्यात होत्या. महायुतीने यापूर्वीच शक्तीप्रदर्शन करत रॅली आणि भेटीगाठी घेऊन प्रचार संपला. रविवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता शहरातील 15 प्रभागाबरोबर या प्रभागाचाही निकाल जाहीर होणार आहे.

local elections Maharashtra
Mahayuti vs MVA : महायुती अन् महाविकास आघाडीच भवितव्य मुंबई ठरवणार? भाजप, ठाकरे शिवसेना, मनसेची रणनीती काय असणार?

FAQs :

1. प्रभाग 10 मध्ये किती टक्के मतदान झाले?
➡️ एकूण 49.78 टक्के मतदान झाले.

2. किती उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद झाले?
➡️ चार उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद झाले.

3. मतदान वाढवण्यासाठी जादा वेळ देण्यात आला होता का?
➡️ होय, दहा ते पंधरा दिवसांचा जादा कालावधी देण्यात आला होता.

4. मतदानाचा टक्का का वाढला नाही?
➡️ नागरिकांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून आला नाही.

5. कमी मतदानाचा कोणत्या पक्षांवर परिणाम होऊ शकतो?
➡️ महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com