Raigad Crime : अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या देवस्थानच्या जागेवर डोळा, जमिनीवर अतिक्रमण; अधिकृत फलकही काढून टाकला

mahad ganpati temple land encroachment case : अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या महड येथे श्री गणपती संस्थानच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
mahad ganpati temple
mahad ganpati templesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महड येथील गणपती संस्थानच्या जमिनीवर अनधिकृत भिंत बांधून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  2. या घटनेमुळे ग्रामस्थ आणि देवस्थान प्रशासनामध्ये संताप निर्माण झाला आहे.

  3. संस्थानने नगरपंचायत, तहसील कार्यालय आणि पोलिसांकडे तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.

raigad news : अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथे श्री गणपती संस्थानच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. कोणतीही परवानगी न घेता रात्रीतून अनधिकृत संरक्षक भिंत बांधल्याने महड ग्रामस्थ आणि देवस्थान प्रशासनामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याप्रकरणी संस्थानने नगरपंचायत, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गापासून दीड किमीवर असलेल्या महड मंदिर परिसरात संस्थानची शेकडो एकर जमीन आहे. महामार्गावर मंदिराकडे जाताना असलेल्या मोक्याच्या जागेवर काही अज्ञात व्यक्तींनी अनधिकृत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू केले. ग्रामस्थांनी हे काम एकदा बंद पाडले होते; मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पुन्हा बांधकाम पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेला देवस्थानचा अधिकृत फलकही काढून टाकला आहे.

संस्थानचे व्यवस्थापक अतुल तट्टू आणि राजेंद्र बडगुजर यांनी नगरपंचायत खालापूर, तहसील कार्यालय आणि पोलिस ठाणे या ठिकाणी लेखी तक्रार अर्ज दिले आहेत. सोबत संस्थानाचा सातबारा आणि आठ अ उतारा अशी कागदपत्रे दिली असून दोषींवर कारवाई करावी आणि देवस्थानच्या जमिनीचे संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील जमिनीला आलेला सोन्याचा भाव याचा फायदा उचलत मोठी टोळी या भागात कार्यरत असून, या टोळीने जमिनी विकण्याचा सपाटा चालवला आहे.

mahad ganpati temple
Raigad Crime : महाड राड्यात मंत्र्यांचा मुलगा आरोपी, अन् तपास करणाऱ्या पोलिसाचाच आत्महत्येचा इशारा; रायगडात नेमकं घडतंय काय?

अतिक्रमण हटवण्याचे आदेश

महड गणपती संस्थान परिसरातील अतिक्रमण हटवण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. हे अतिक्रमणधारकाने स्वतः न काढल्यास त्यावर नगर पंचायतीतर्फे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येईल व त्याची वसुली अतिक्रमणधारकाडून करण्यात येईल, अशी माहिती नगर पंचायत प्रशासन प्रणित भोसले यांनी दिली आहे.

देवस्थान संस्थान, महडच्या मालकीची असून, या ठिकाणी लावलेला संस्थानचा फलकदेखील काढून टाकला होता. याबाबत सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटवण्याचा आदेश दिला असून, नगर पंचायतीकडे अतिक्रमण हटवण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत.

- मोहिनी वैद्य, कार्याध्यक्षा, श्री गणपती संस्थान, महड

महड गणपती हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या दृष्टीने भविष्यात विविध सोयी-सुविधांसाठी जागेची गरज आहे. अशा प्रकारे देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण होऊन जागा हडप करण्यात येत असेल तर ग्रामस्थ पूर्णपणे श्री गणपती संस्थानच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

- मंदार जोशी, महड ग्रामस्थ

mahad ganpati temple
Raigad Crime : कोकणात ZP च्या तोंडावर पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ! कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

FAQs :

1. हा प्रकार कुठे घडला आहे?
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड येथे हा प्रकार घडला आहे.

2. नेमके काय घडले?
गणपती मंदिराच्या जमिनीवर रात्रीतून अनधिकृत भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले.

3. कोणत्या संस्थेने तक्रार केली आहे?
श्री गणपती संस्थानने संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.

4. ग्रामस्थांची प्रतिक्रिया काय आहे?
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

5. पुढे काय कारवाई होऊ शकते?
प्रशासनाकडून चौकशी करून दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com