Corruption Case : फडणवीसांच्या खात्यावर ACB ची धडक! लाखोंच्या लाचप्रकरणी अधिकारी अटक, झिरवाळ प्रकरणानंतर पुन्हा खळबळ

ACB arrests finance department officer : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या क्लर्कला अटक होण्याची घटना ताजी असतानाच आता अर्थ आणि नियोजन विभागातील बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
Corruption Case
Corruption Casesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना ACB ने खारघरमध्ये लाच घेताना अटक केली

  • निधी मंजुरीसाठी तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

  • या घटनेमुळे राज्यातील प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला

Mumbai Crime News : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्याला क्लर्कला काही दिवसांपूर्वी एसीबीकडून अटक झाली होती. ज्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. तर मंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी विरोधकांनी लावून धरली होती. आता हे प्रकरण पूर्णपणे शांत झाले असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या अर्थ आणि नियोजन खात्यातील बडा अधिकाऱ्याला अटक झाली आहे. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात सापडला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) खारघर परिसरात कारवाई करत त्याला अटक केली आहे. या अधिकाऱ्याचे नाव विलास लाड असे असून तो कक्ष अधिकारी या पदावर आहे. Maharashtra officer caught red handed with cash during ACB operation

काहीच दिवसांपूर्वी मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात ACB ने मोठी कारवाई केली होती. या कारवाईत झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला अटक करण्यात आली होती. तर या लिपिकानं २५ हजारांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

या प्रकरणानंतरच मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा राज्यभर चांगलाच गाजला होता. तर या मुद्द्यावर अधिवेशानात देखील जोरदार चर्चा झाली होती. तसेच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

Corruption Case
Pune ACB trap : महसूल विभागात खळबळ! 'बडा मासा' एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकला; प्रांताधिकाऱ्यांवरच होणार कठोर कारवाई

आता हे प्रकरण शांत झाले असतानाच पुन्हा एकदा मंत्रालयातील खाबूगिरीचा मुद्दा समोर आला आहे. मंत्रालयातल्याच एका अधिकाऱ्याला एसीबीने लाच घेताना अटक केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली असून खारघर परिसरात लाखोंची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे. विलास लाड असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी म्हणून हा कार्यरत आहे.

लाड याने निधी मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. ज्याची तक्रार एसीबीकडे देण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचून लाचखोर अधिकारी लाड याला खारघर परिसरात लाच घेताना रंगेहाथ अटक केली. तर याबाबत मिळालेली माहिती नुसार मंत्रालयातून निधी मंजूर करून देण्यासाठी विलास लाड याने लाच मागितली होती. तर त्याला खारघर परिसरात एसीबीने ६ लाख ३७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

या घटनेनंतर आता राज्यभर खळबळ उडाली असून मंत्रालयातील कामासाठी लाच घेताना अशा पद्धतीने अधिकाऱ्याला अटक झाल्याची ही दुसरी घटना समोर आली आहे. तर अर्थ व नियोजन विभाग हा मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या खात्या अंतर्गत येत असल्याने यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्याच खात्यावर वचक राहिली की नाही असा सवाल आता दबक्या आवाजात विचारला जात आहे.

Corruption Case
Kolhapur Bribery Case : कोल्हापुरात अवघ्या 2 हजारांसाठी रंगपंचमी दिवशीच महापालिका अधिकाऱ्याने दाखवले खरे रंग! लाच घेताना रंगेहात ACB च्या जाळ्यात सापडला

 FAQs :

1. विलास लाड कोण आहेत?
ते महाराष्ट्राच्या अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी आहेत.

2. त्यांना कशासाठी अटक करण्यात आली?
निधी मंजुरीसाठी 6.37 लाख रुपयांची लाच घेताना ACB ने त्यांना अटक केली.

3. ही कारवाई कुठे झाली?
खारघर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

4. ACB म्हणजे काय?
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे ACB, जो भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतो.

5. या प्रकरणाचा पुढील तपास काय असेल?
ACB पुढील तपास करून अधिक माहिती गोळा करेल आणि संबंधितांवर कारवाई होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com