Pune News : पुणे जिल्ह्यात महसूल विभागात खळबळजनक घटना घडली आहे. एसीबीने मोठी कारवाई करीत दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या प्रांताधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बिल्डिंग कंपलीशन सर्टिफिकेट देण्यासाठी संबंधित प्रांताधिकाऱ्याने लाच मागितली होती. दोन लाखांची लाच स्वीकारताना शुक्रवारी एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.
गोविंद शिंदे असे या लाचखोर प्रांताधिकाऱ्याचे नाव आहे. जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बिल्डिंग कंपलीशन सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांनी लाच मागितली असल्याचे पुढे आले आहे. या बाबत तक्रार करण्यात आल्यानंतर एसीबीने सापळा रचला होता. त्यानुसार शुक्रवारी लाच घेणार असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता एसीबीने त्यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचला होता. ज्यामध्ये प्रांतधिकारी शिंदे अडकले. एसीबीची पुढील कारवाई सुरु असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, थेट प्रांताधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
प्रांतधिकारी शिंदे हे तक्रारदाराकडून तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेत होते. त्यावेळी एसीबीच्या पथकाने लाच घेत असताना त्यांना ताब्यात घेतले आहे. एसीबीने शिंदे यांच्या कार्यालयातुन त्यांनी अटक करण्यात आली आहे. एसीबी व पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.