Uddhav Thackeray : कोकण गुंडांचे की लोकशाही मानणाऱ्यांचे? रत्नागिरीतील सभेतून ठाकरेंचा राणे-सामंतांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray criticizes Rane and Samant in Ratnagiri: "आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो, परंतु ही ठाकरेंची परंपरा आहे. पण रत्नागिरीतील दोन भाऊ, सिंधुदुर्गातील दोन भाऊ आणि वडील ही घराणेशाही नाही का? हे कोकण खायला बसले आहेत. कोकणी बांधव शांत राहतो पण त्याला जे करायचे ते बरोबर करतो."
Narayan Rane, Uday Samant, Uddhav Thackeray
Narayan Rane, Uday Samant, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोकणातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेतून भाजप आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल केला आहे.

"कोकणी बांधव शांत राहतो पण त्याला जे करायचे ते बरोबर करून दाखवतो. मला खात्री आहे, गुंडशाहीला कोकणी माणूस चूड लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी राणे आणि सामंत कुटुंबियांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "आमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो, परंतु ही ठाकरेंची परंपरा आहे. पण रत्नागिरीतील दोन भाऊ, सिंधुदुर्गातील दोन भाऊ आणि वडील ही घराणेशाही नाही का? हे कोकण खायला बसले आहेत. कोकणी बांधव शांत राहतो पण त्याला जे करायचे ते बरोबर करतो. मला खात्री आहे की गुंडशाहीला कोकणी माणूस चूड लावल्याशिवाय राहणार नाही."

Narayan Rane, Uday Samant, Uddhav Thackeray
Rahul Gandhi: शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्यासाठी राहुल गांधी नागपूरला; बावनकुळेंच्या आरोपाने खळबळ

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बाळासाहेब माने यांच्या प्रचार सभेत बोलत होते. ते म्हणाले, "आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे, महाराष्ट्र कोणीही पैसे फेकून विकत घेऊ शकत नाही. आता मशाल पेटली असून ती खोकेबाज राजकारण भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही.

Narayan Rane, Uday Samant, Uddhav Thackeray
Ajit Pawar : "रामराजे निंबाळकरांना नोटीस पाठवणार..."; अजितदादा संतापले, नेमकं काय म्हणाले?

कोकण हे गुंडांचे की लोकशाही मानणाऱ्याचे हे ठरवण्याची वेळ आली असून पैशाचा माज आलेल्यांना धडा शिकवण्याची ही वेळ असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी राज्यात आपली सत्ता आल्यास, सर्व जिल्ह्यांत शिवाजी महाराजांचे मंदिर उभारू, मुलांना मोफत शिक्षण देऊ, पाच वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासह प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र महिला पोलिस ठाणी उभारू असं आश्वासन दिलं. तसंच बहुचर्चित आणि वादग्रस्त बारसू प्रकल्प रद्द करू असा शब्द त्यांनी कोकणवासीयांना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com